मुंबई

प्रबोधनकार ठाकरे सरोवरात नौकाविहार

CD

प्रबोधनकार ठाकरे सरोवरात नौकाविहार
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; लवकरच लेझर शो

कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे सरोवरात (शेनाळे तलाव) सुरू केलेल्या नौकाविहाराच्या सुविधेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उत्साहामुळे प्रेरित होऊन कल्याण-डोंबिवली महापालिका आता या ठिकाणी विविध अत्याधुनिक सुविधा पुरवणार आहे, ज्यामुळे हे सरोवर कुटुंबासमवेत विरंगुळ्यासाठी एक प्रमुख केंद्र ठरणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या सरोवराच्या परिसरात लवकरच फ्लोटिंग ब्रिज, आकर्षक कारंजे, उपहारगृह (कॅफेटेरिया), लेझर शो आणि लहान मुलांसाठी विशेष खेळण्याची जागा यांसारख्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

तलावाभोवती असलेल्या जॉगिंग ट्रॅकची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे, तसेच व्यायामासाठी विशेष जागा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. नौकाविहार करणाऱ्या नागरिकांना बोटीत बसूनच नयनरम्य लेझर शो आणि म्युझिकल फाउंटनचा आनंद घेता येणार आहे. तलावाच्या जॉगिंग ट्रॅकवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या काही नागरिकांनी सौंदर्यीकरणाला गैरसमजुतीतून विरोध दर्शवला होता, मात्र जॉगिंग ट्रॅकच्या सुविधेत कोणताही अडथळा न आणता, तलाव परिसराच्या सौंदर्यीकरणाला बाधा न आणता चांगल्या सुविधा पुरवल्या जातील, अशी माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.

पर्यटनाला चालना
सिटीपार्क पाठोपाठ प्रबोधनकार ठाकरे सरोवर हे आता कल्याणमधील नागरिकांसाठी निसर्गरम्य व रमणीय स्थळ ठरत आहे. सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या नववर्षात सरोवराचे अधिक सौंदर्यीकरण करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन आहे. प्रबोधनकार ठाकरे सरोवर दररोज सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या विविध सुविधांमुळे आणि सौंदर्यीकरणामुळे नागरिकांसाठी आरोग्यदायी जीवनासाठी आणि विरंगुळ्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला असून, यामुळे कल्याण शहराच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पैशासाठीच प्रमोद महाजनांची हत्या? प्रवीण महाजन भावाला करत होते ब्लॅकमेल'; प्रकाश महाजनांच्या दाव्यावर काय म्हणाल्या सारंगी महाजन?

Gadhinglaj Accident:'मोटारीच्या धडकेत रिक्षातील महिला ठार'; आठ जण जखमी: संकेश्वर - बांदा महामार्गावर दुर्घटना

Latest Marathi News Live Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

SCROLL FOR NEXT