मुंबई

श्री संत शितोळेबाबा दरबाराचा उद्‌घाटन

CD

श्री संत शितोळेबाबा दरबाराचे उद्‌घाटन
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः येथील असल्फा नगरात बुधवारी (ता. २९) संत श्री शितोळेबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री संत शितोळेबाबा दरबाराचा उद्‌घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. लांडे यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज मठ आणि श्री संत शितोळेबाबा दरबाराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. २८ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता गणेशपूजन, पुण्याह वाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, मुख्य देवता स्थापना, क्षेत्रपाल मंडल स्थापना, वास्तूमंडल स्थापना, योगिनी मंडल स्थापना, नवग्रह पूजन ईशान्य रुद्र कलश पूजा आदी विधी होतील. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून स्थापित देवता पूजन, मूर्ती उग्नतरण विधी, मुख्य देवता हवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, क्षेत्रपाल बली पूजा, पूर्णाहुती, आरती केली जाईल. नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Maggi Video: डिग्रीपेक्षा कढई भारी? डोंगरात मॅगी विकून लाखोंची कमाई; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : भारत-युरोपियन संघाच्या मुक्त व्यापार करारावर सह्या : PM मोदी

Girish Mahajan Statement : 'आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो', प्रजासत्ताक दिनाच्या राड्यानंतर गिरीष महाजनांनी व्हिडिओ जारी करत दिलगिरी केली व्यक्त

वैभव सूर्यवंशीला पाकिस्तानी घाबरले; १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमधील India vs Pakistan लढतीवर बहिष्कार टाका! मिळाला अजब सल्ला...

रागाच्या भरात नाही, तर या कारणामुळे ओंकारने घेतला आलोक सिंग यांचा जीव, माजी आमदाराची पोस्ट चर्चेत!

SCROLL FOR NEXT