मुंबई

पावसाळा संपताच कालव्याचे काँक्रीटीकरण

CD

कासा, ता. २७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्याच्या उर्वरित काँक्रीटीकरणाच्या कामाला पावसाळा संपताच तातडीने सुरुवात झाली आहे. सध्या रानशेत भागातील चार किमी, वधना येथे दीड किमी आणि वांगरजे येथील दोन किमी कालव्याचे काम जोरात सुरू आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभाग सज्ज असून, आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

१९८२मध्ये उभारण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांत गाळ साठल्याने आणि पाणी गळतीमुळे अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या समस्यांवर उपाय म्हणून कालव्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील सात किमी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे आणि अधिक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत आहे.

सध्या दुसऱ्या टप्प्यातील काम रानशेत, वधना आणि वांगरजे या भागात सुरू आहे. पाटबंधारे विभागाने पावसाळ्यानंतर तातडीने काम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतकरी जयप्रकाश कोदे म्हणाले, की कालव्यांचे काँक्रीटीकरण झाल्यामुळे पाणी वाया जाणार नाही. पाण्याची बचत होईल आणि अपव्ययावर नियंत्रण येईल. हे काम खूप आवश्यक आणि उपयुक्त आहे.

तीन तालुक्यांना लाभ
विक्रमगड, डहाणू आणि पालघर तालुक्यांतील सुमारे ९१ हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. डाव्या तीर कालव्याचेही काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर लवकरच पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

१५ डिसेंबरपर्यंत शेतीला सिंचनासाठी पाणी सोडायचे नियोजन आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होताच अनेक ठिकाणी कालव्याच्या काँक्रीटीकरण कामाला त्वरित सुरुवात केली आहे, मात्र अधूनमधून वादळी वारे व पावसामुळे कामात थोडा व्यत्यय येत आहे. तरीही काम जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- प्रवीण भुसारे, अभियंता, पाटबंधारे विभाग, धामणी धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor Death Case: हत्या की आत्महत्या? एका वेलांटीवरुन डॉक्टर युवतीचं मृत्यू प्रकरण उलगडण्याची शक्यता

Share Market Closing : फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाआधी सेन्सेक्स 369 अंकांनी वधारला; तर निफ्टी निर्देशांक 26,000 वर, जाणून घ्या कोणत्या शेअर्सने दिले सर्वाधिक परतावे

Latest Marathi News Live Update : एडवोकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालयात दाखल

SBI Job Vacancy 2025: SBI जॉब अलर्ट! स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू, पॅकेज तब्बल 1.35 कोटी

बिग बॉस 19 साठी सलमानला मिळतं 150-200 कोटी मानधन ! निर्मात्याचा धक्कादायक खुलासा "आम्ही भांडतो पण.."

SCROLL FOR NEXT