मुंबई

जामशेतमध्ये आमदारांच्या स्वखर्चातून पथदिवे

CD

कासा, ता. २६ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील जामशेत गावामधील जामशेत येथील पाटीलपाडा (गावदेव) व सतीमाता परिसरात आमदार विनोद निकोले यांनी स्वखर्चातून नवीन पथदिवे बसवून परिसराला उजेडाची नवी झळाळी दिली आहे. गावदेवाच्या सणानिमित्त गावाचा चेहरामोहरा उजळणारा उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य होते. पथदिवे नसल्यामुळे ग्रामस्थांना रात्री प्रवास करताना, विशेषतः महिलांना आणि विद्यार्थ्यांना, मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येची दखल घेत आमदार विनोद निकोले यांनी स्वतःच्या खर्चातून पथदिव्यांची व्यवस्था केली. गावदेवाच्या सणाच्या मुहूर्तावर या प्रकाशयोजनेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गावाचे सरपंच विकास दौडा, उपसरपंच मोहन पडवले, माजी सरपंच अशोक धोडी, ग्रामपंचायतीचे सदस्य, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन पथदिव्यांच्या उजेडात पाटीलपाडा आणि सतीमाता परिसर प्रकाशमान झाला असून, गावदेवाच्या सणाला नवसंजीवनी लाभली आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : दाट धुक्यानं घात केला, ट्रक अचानक थांबला अन् मागून १२ गाड्या एकमेकांवर आदळल्या; महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai: गर्दीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा! मुंबई लोकलच्या 'या' स्थानकावर एलिव्हेटेड डेक बांधणार; प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार

IPL 2026 Mock Auction: कॅमेरून ग्रीनसाठी CSK ने मोजले २१ कोटी, इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनसाठी KKR ने रिकामी केली झोळी

Unclaimed Money : आपला पैसा परत मिळवा! मोदी सरकार देत आहे बँक, विमा आणि म्युच्युअल फंडमधील विसरलेले पैसे, जाणून घ्या कसे मिळणार

Viral Video: भिकारी वाटणाऱ्या व्यक्तीने अचानक फाडफाड इंग्रजी बोलताच लोक अवाक्, कोण आहेत हे आजोबा ? पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT