मुंबई

महायुतीत दोस्तीत कुस्ती होणार?

CD

मोखाडा, ता. २७ (बातमीदार) : दिवाळी सण सरताच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालघर जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा देत निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने तालुकानिहाय मेळावे घेत स्वबळाची चाचपणी केली आहे. जिल्ह्यात हे दोनच पक्ष सद्य:स्थितीत मातब्बर असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप-शिवसेना यांच्या दोस्तीत कुस्ती होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यासह पालघर जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. दिवाळी सणात प्रचाराची धामधूम मंदावली होती, मात्र सण सरताच पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींनी जोर धरला आहे. पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये इनकमिंगची जणू स्पर्धाच सुरू आहे. महायुतीतील दोन्ही घटक पक्ष आपणच जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे असल्याचे दावे करीत मेळावे आणि पक्षप्रवेश सोहळ्यातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संभाव्य इच्छुक उमेदवारांनी दिवाळी सणात शुभेच्छांची बॅनरबाजी करून प्रचाराला सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडी एकसंघ होऊन आगामी निवडणुका लढणार असल्याच्या सुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते बैठका घेत आहेत. राज्यातील नेते आगामी निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याची वक्तव्ये करीत असताना पालघर जिल्ह्यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत उघड संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय फळी
गतवेळी एकसंघ शिवसेना फुटीनंतर जिल्हा परिषदेत १८ सदस्य असलेला शिंदे गट प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. आपणच जिल्ह्याचे खरे वारसदार असल्याचे दाखवण्यासाठी शिंदे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे गटानेही तालुकानिहाय फळी उभी करून कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे सुरू केले आहेत. जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुकानिहाय जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या असल्याने त्यांनीही मेळावे घेत स्वबळाची चाचपणी केली आहे.

वादाची ठिणगी
पालघर जिल्हा परिषदेत कोणत्याही परिस्थितीत स्वबळाची सत्ता आणण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. रजपूत यांनी जिल्हा परिषदेच्या ५७ पैकी ३५ जागा स्वबळावर निवडून आणण्याचा संकल्प केल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निष्ठावंतांवर विश्वास
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने या गटाची ताकद जिल्ह्यात कमी झाली आहे, मात्र आजही निष्ठावंत कार्यकर्ते आणि मतदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा या गटाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीकडे रवाना

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Ajit Pawar Death: कामाचा माणूस गेला; सोलापूरकर भावुक, साेलापुतील चौकाचौकांत उभारले बॅनर!

Minister Mkarand Patil: महाराष्ट्राच्या कामाचा माणूस...

SCROLL FOR NEXT