मुंबई

भारतीय संस्कारांनी पुढील पिढी घडवण्यासाठी वाचनसंस्कृतीची आवश्यक" – मोहन पडवळ

CD

पुढील पिढीसाठी वाचनसंस्कृती आवश्यक ः मोहन पडवळ
ठाणे, ता. २८ (बातमीदार) : भारतीय संस्कारांनी उद्याची पिढी घडवायची असल्यास वाचनसंस्कृती अधिक घट्ट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चित्रपट कथालेखक मोहन पडवळ यांनी केले. पुस्तकांचे वाचन करणारी पिढी जगात कुठेही स्वतःला सिद्ध करू शकते. माणूस म्हणून घडण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.
हे उद्गार त्यांनी शारदा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या लेखक संभाजी नवले यांचा कथासंग्रह ‘यस्तार’च्या प्रकाशन सोहळ्यात केले. सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मोहन पडवळ उपस्थित होते. या वेळी प्रा. एस. डी. नरवाडे, कवी विजयानंद साळवे, सुरेश तिकोणे आणि लेखक संभाजी नवले यांचीही उपस्थिती होती. कथासंग्रह ‘यस्तार’ ग्रामीण कथांवर आधारित असून, कष्टकरी माणसाच्या जिद्दीची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद या गावाच्या माती, दगड आणि कड्याकपारींनी दिली असल्याची भावना लेखकाने व्यक्त केली. लेखकाने प्रसिद्ध लेखक व कवी देवा झिंजाड यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले. कथासंग्रहाचे प्रकाशन मोहन पडवळ, प्रा. एस. डी. नरवाडे आणि कवी विजयानंद साळवे यांच्या हस्ते झाले. प्रा. नरवाडे म्हणाले, की विद्यार्थ्यांना मी काय दिले आणि त्यांनी काय घेतले याचं मूल्यमापन करता मला आपल्या सर्वांच्या कर्तृत्वाचे फळ दिसते.

चित्रपटासाठी ‘यस्तार’ची निवड
मोहन पडवळ यांनी उपस्थितांना वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्या कलागुणांचा शोध घेण्याचे आणि त्याला वाव देण्याचे मार्गदर्शन केले. यस्तार गावचे लोकेशन इतके सुंदर आहे, की ते त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी ठिकाण म्हणून निवडले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाला पांगलेला थवा व सुरेश तिकोणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईतील ट्रेनमधील शौचालयाची दुर्गंधी दूर होणार! रेल्वेचा क्रांतिकारी निर्णय; नवीन योजना काय?

Manisha Mhaiskar : मोठी बातमी! कडक शिस्तीच्या मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव, तर मिलींद म्हैसकर यांच्याकडे बांधकाम विभाग

IND vs NZ 5th T20I: इशान किशन खेळणार, संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? टीम इंडियाच्या बॅटींग कोचने दिले महत्त्वाचे अपडेट्स

EXCLUSIVE: प्रभूचा कंटेन्ट अश्लील असूनही त्याला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर एकदा वाचाच

Budget Expectations 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

SCROLL FOR NEXT