मुंबई

आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी एकत्रित लढणार

CD

मनोर, ता. २८ (बातमीदार) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांसाठी लढाई आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महिनाभराचे नियोजन करून महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी केले. तालुका स्तरावरील बैठकांमध्ये उमेदवारांची नावे निश्चित करून जिल्ह्यातील जागावाटपासाठी येत्या आठवड्यात जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा सर्वानुमते करण्यात आली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महामार्गावरील हॉटेल कुमार पार्क येथे रविवारी (ता. २६) पार पडली. या वेळी ते बोलत होते. राजकीय पक्षाची ताकत असलेल्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केली पाहिजे. महायुती सरकारच्या कारभाराबाबत लोकांमध्ये रोष आहे. निवडणुकीआधी मतदार याद्यांवर लक्ष दिले पाहिजे. सहा महिन्यांत निकाल बदलतो कसा, असा प्रश्न उपस्थित करीत विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान केले गेले. बोगस मतदानासाठी लाडकी बहीण मुखवटा म्हणून वापर केला गेला. ग्रामीण भागात नाही, परंतु शहरी भागात बोगस मतदार घुसवले जातात. निवडणुकांसाठी कमी वेळ शिल्लक आहे, परंतु महायुतीच्या सरकारची मुजोरी संपवण्यासाठी जिल्हा परिषदेवर झेंडा फडवकण्याची जिद्द बाळगण्याचे आवाहन माकपचे आमदार विनोद निकोले यांनी केले.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार बळीराम जाधव यांनी केले. महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी हट्ट न करता प्रामाणिकपणे काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. उमेदवारांमधील नाराजी दूर करण्यासाठी नेते दक्षता घेतील, परंतु कुठेही मैत्रीपूर्ण लढती आणि गद्दारी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागेल, असे मत बळीराम जाधव यांनी व्यक्त केले.

मतदार याद्यांवर लक्ष ठेवावे!
सद्य:स्थितीत तक्रार करण्याची वेळ नाही. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार महाविकास आघाडीचा असेल, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी व्यक्त केले. बोगस मतदार नोंदणीमुळे या याद्यांवर काम करण्याची गरज आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष द्यायला जिल्हा प्रशासन तयार नाही. पैशाच्या लढाईत बरोबरी करू शकत नाही, परंतु समाजाचे हित समोर ठेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याची चुकीची प्रतिमा तयार केली; ममता कुलकर्णींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

Woman Doctor Case: आम्हाला गोवण्याचे विरोधकांचे षडयंत्र: दिलीपसिंह भोसले; सुषमा अंधारे, आगवणेंच्या मागे कोणीतरी मास्टरमाइंड

Yashani Nagarajan: माध्यमिक शिक्षण विभागाच्या सखोल चौकशीसाठी समिती: कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन; चुकीचे काम करणाऱ्यांची गय नाही

Woman Doctor Case: 'गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांकडे'; फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी संशयितांना आज न्यायालयात हजर करणार

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आचारसंहितेपूर्वी दोन हप्ते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची १५ नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT