मुंबई

शिक्षणाचा ‘स्मार्ट’ श्रीगणेशा

CD

शिक्षणाचा ‘स्मार्ट’ श्रीगणेशा
रायगड जिल्ह्यात ३१५ नवीन अंगणवाड्या
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) ः अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाने ‘स्मार्ट अंगणवाडी’ योजनेला गती दिली आहे. या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यात ३१५ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी मिळाल्याने शिक्षणाचा प्रसार होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा, महाड, अलिबाग, पोलादपूर, कर्जत, खालापूर, सुधागड, पनवेल तालुक्यातील अंगणवाड्यांचा योजनेत समाविष्ट आहेत. या प्रकल्पामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण, आरोग्यसेवा मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच बालकांच्या आरोग्य, पोषणस्थिती, वाढीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल. या उपक्रमामुळे गर्भवती आणि स्तनदा महिलांना आरोग्य सेवा, पोषण मार्गदर्शन अधिक सुलभपणे उपलब्ध होईल. महिला व बालविकास विभाग राज्यातील सर्व अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक, कार्यक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
--------------------------------
स्मार्ट अंगणवाडी योजना ग्रामीण, शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
- आदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Last Video: आठवणीतले अजितदादा… मनमोकळ्या हास्याचा 'हा' शेवटचा व्हिडिओ अश्रूंमध्ये सोडून गेला

Ajit Pawar Death : महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता गमावला... ! सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात व्यवहार ठप्प

Ajit Pawar Plane Crash: ''हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं'', प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

Ajit Pawar Death: अजित पवारच नाही, तर देशातील 'या' नेत्यांनीही विमान अपघातात गमावलाय जीव...

SCROLL FOR NEXT