मुंबई

गोधन चोरीचा प्रयत्न फसला

CD

गोधन चोरीचा प्रयत्न फसला
कर्जत तालुक्यात टोळी सक्रिय, ग्रामस्थ चिंतित
कर्जत, ता. ३० (बातमीदार) ः सालवड गावात दिवाळीच्या काळात गोधन चोरण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा डाव उधळला गेला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार वारंवार होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत.
कर्जत शहरात चिंचवाडीतील योगेश पारधी यांच्या गोठ्यातून दोन बैल चोरीला गेले होते. नेरळ पोलिसांनी केवळ दहा दिवसांत कल्याणहून इमरान अहमद शेख आणि इम्तियाज इलियाज शेखला अटक केली. नांगुर्ले गावाजवळ निर्जन भागात जनावरांची कत्तल करून मांस चोरीला नेल्याचे आढळले आहे. मांडवणे येथील गोशाळेतील दोन गायींचा मांडवणे-रिव्हर गेट रोडलगत एका गाईची निर्घृण हत्या करण्यात आली होती. कर्जत-मुरबाड रस्त्यालगत सुगवे येथे संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात तीन गायी, तीन वासरे आणि एक बैल सापडला होता. या प्रकरणात पोलिसांनी साळोख येथील दोन आरोपींना अटक केली होती. पिसाळलेल्या बैलाने एका व्यक्तीचा जीव घेतला तर पाच जणांना जखमी केले होते. या बैलाला चोरट्यांनी अर्धवट भूल दिल्याने पिसाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली कॅप्टन शांभवी पाठक कोण?

Ajit Pawar Death News LIVE Updates: सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत दाखल, भावनिक वातावरण

Ajit Pawar Plane Crash : अपघातग्रस्त विमान चालवणारे पायलट नेमके कोण होते? १५ वर्ष विमान चालवण्याचा होता अनुभव

Ajit Pawar: 'पिंपरी-चिंचवड ते बारामती, विकासाची ठसठशीत छाप'; राज ठाकरेंनी आठवला अजित पवारांचा प्रवास, भावनिक पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT