मुंबई

नेरूळमधील गणेश रामलीला मैदानाची दुरवस्था

CD

नेरूळमधील गणेश रामलीला मैदानाची दुरवस्था
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर १३ मधील प्रसिद्ध श्री गणेश रामलीला मैदानाची सध्या दुरवस्था झाली आहे. मैदानात सर्वत्र चिखल, कचरा आणि डेब्रिजचा साठा झाल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे खेळाडू, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मैदानाची साफसफाई करण्यात यावी म्‍हणून नवी मुंबई महापालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर येत्या ९ नोव्हेंबरला अर्जांची मोहीम राबवणार आहेत.
श्री गणेश रामलीला मैदान हे नेरूळ परिसरातील एक महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण मानले जाते. या मैदानावर खेळाडूंचा दैनंदिन सराव, पोलिस भरतीसाठी तयारी, राजकीय सभा आणि धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच सायंकाळी स्थानिक युवक येथे क्रिकेट खेळतात. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून या मैदानाची स्वच्छता न झाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मैदानाचा वापर केला जाऊ नये, यासाठी जवळील एका महाविद्यालयाने जाणूनबुजून मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याचा आरोप मनोज मेहेर यांनी केला आहे. सध्या हे मैदान क्रीडांगणापेक्षा कचरा डेपो अधिक वाटत आहे. या डेब्रिज आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. खेळाडूंना सरावासाठी आणि पोलिस भरतीसाठी येणाऱ्या युवक-युवतींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील काळात नवी मुंबईची ओळख असलेला आगरी कोळी उत्सव याच मैदानावर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी मैदान तातडीने स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. मनोज मेहेर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, की जर महापालिका प्रशासनाने संबंधित महाविद्यालयावर तत्काळ कारवाई केली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या वतीने हे डेब्रिज विभाग कार्यालयासमोर किंवा महाविद्यालयाच्या आवारात टाकण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

BCCI CENTRAL CONTRACT FOR 2025-26: रोहित शर्मा, विराट कोहली A+ मधून थेट B ग्रेडमध्ये; शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा अव्वल श्रेणीत

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT