मुंबई

काम बंद आंदोलन केल्यास गुन्हा!

CD

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील स्थायी अथवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यापुढे अचानक काम बंद आंदोलन केले, तर त्यांच्यावर नियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिला आहे.

महापालिकेचे पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय आरोग्य, परिवहन आदी विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात. या विभागांकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा अखंडित सुरू राहणे अपेक्षित असते, मात्र अनेकवेळा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी या विभागातील स्थायी अथवा अस्थायी कर्मचारी अचानक काम बंद आंदोलन पुकारतात. त्यामुळे या सेवा काही काळासाठी ठप्प होतात. त्याचा नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. महापालिकेच्या या सेवांवर नागरिक अवलंबून असल्याने त्याचा फायदा कर्मचाऱ्यांकडून घेतला जातो व प्रशासनाला वेठीस धरले जाते.

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षक अधिनियमानुसार अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन करण्यास मनाई आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी संप अथवा नागरिकांची गैरसोय होईल, अशा पद्धतीने वर्तन केल्यास कारवाई करण्याची तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे, मात्र अनेकवेळा त्यांनी अचानक आंदोलन केल्यानंतरही महापालिकेने त्यांच्याविरोधात ठोस कारवाई केली नव्हती. आता मात्र आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी यासंदर्भातील लेखी आदेश जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT