मुंबई

पान ६

CD

पालिका वाहनचालकाची कन्या झाली सीए
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी पालिकेतील वाहनचालक चंद्रशेखर धेडे यांची कन्या गायत्री हिने इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या बळावर सीए या आव्हानात्मक परीक्षेत यश मिळवले आहे. भिवंडी महापालिकेत २८ वर्षांपासून वाहनचालक म्हणून सेवा देणाऱ्या धेडे यांच्या कन्येने या परीक्षेत यश मिळवून पालकांचा मान उंचावला आहे.
गायत्री चंद्रशेखर धेडे हिने माध्यमिक शिक्षण कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर वझे केळकर महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत सीए अभ्यासाची तयारी केली. कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळवत तिने पालिकेचा आणि शहराचा अभिमान वाढवला आहे. पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी मुख्यालयात पुष्पगुच्छ देऊन गायत्रीचे अभिनंदन केले. शासकीय वाहनचालक संघटनेच्या भिवंडी विभागातर्फे अध्यक्ष राजेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व वाहनचालकांनी गायत्री व तिच्या पालकांचा सत्कार केला.

वकिलांवरील हल्ल्याचा भिवंडीत निषेध
भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे ॲड. रवींद्र सकट यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडी वकील संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली.
सकट यांनी न्यायालयात उलटतपास केल्याचा राग मनात धरून एका साक्षीदाराने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेने राज्यभरातील वकिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर पारित करण्याची मागणी केली आहे. सरकारने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने वकील संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही घटनेबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वकील संरक्षण कायद्याबाबत पत्र दिल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी काम बंद आंदोलन न करता लाल फित लावून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेत निषेध नोंदवला.

-----
अंबाडी गटातून मविआकडून ज्योती पाटील इच्छुक
वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारीला वेग दिला आहे. अंबाडी या जिल्हा परिषद गटातून मविआकडून ज्योती पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.
अंबाडी गटातील ज्योती पाटील यांना राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. त्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वीकृत सदस्य मिठाराम पाटील यांच्या कन्या, तर ग्रुप ग्रामपंचायत अस्नोलीच्या माजी उपसरपंच नयना पाटील यांच्या सून आहेत. अंबाडी झिडके गणाचे सचिव प्रभाकर पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. स्थानिक महिला वर्गात त्यांचा चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असल्याने त्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मजबूत इच्छुक म्हणून चर्चेत आहेत. अंबाडी हा तालुक्याचा मध्यवर्ती व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा गट आहे. यावर्षी या गटात सर्वसाधारण स्त्री सदस्य असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या गटातून ज्योती यांची उमेदवारी मविआच्या बाजूने मजबूत ठरणार असल्याचे स्थानिकांचे मत आहे. उमेदवारी जाहीर होताच अंबाडी परिसरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास कार्यकर्ते आणि समर्थक व्यक्त करत आहेत.

झाड पडल्याने वाहतूक ठप्प
सरळगाव (बातमीदार) : कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावरील सावरणे गावाजवळ मोठे झाड रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर पडलेल्या झाडाची माहिती ‘मृत्युंजय देवदूत’ या सामाजिक ग्रुपवर एका नागरिकाने शेअर केली. दोन तासांनंतर घटनेची दखल घेण्यात आली, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. झाड रस्त्यावर पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चाने परिश्रम घेत चारचाकी वाहने जाऊ शकतील, असा तात्पुरता मार्ग मोकळा केला. नंतर जेसीबीच्या साह्याने झाड हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महामार्गावर झाडे छाटणीचे काम वेळोवेळी करावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

सरळगाव : राष्ट्रीय महामार्गावर पडलेले झाड.

गोरसईत काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर येत असताना अनेक ठिकाणी विकासकामांना सुरुवात करण्याचा सपाटा लोकप्रतिनिधींनी सुरू केला आहे. शहराजवळील गोरसई ग्रामपंचायत क्षेत्रात महामार्गापासून पोस्टमन पाड्यापर्यंत दोन कोटी ८० लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते नारळ वाढवून झाले. या वेळी भाजप भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण ठाकरे, भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ अध्यक्ष नीलेश गुरव, भाजप व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष यशवंत सोरे, शरद ठाकरे, उमेश गायकवाड, विलास भोईर, अनंत केणे, मुरलीधर केणे, रविकांत पाटील, सुनील पाटील, तसेच गोरसई सरपंच सुदेश गायकवाड, सावंदे सरपंच प्रतिभा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरकारने शहर आणि ग्रामीण भागात रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनीही या कामांवर लक्ष ठेवून कामाचा दर्जा उत्तम राहील यासाठी दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन आमदार चौघुले यांनी केले.


भिवंडी : गोरसई येथे महामार्ग ते पोस्टमन पाडा काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.


आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भिवंडीकरांचा जलवा
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : गोवा मेसा येथील पदम इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भिवंडीतील युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानंतर भिवंडीत या खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. वर्ल्ड फनकोशी शोतोकान कराटे ऑर्गनायझेशनचे संस्थापक मास्टर हसन इस्माइल यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. स्पर्धेत भारतासह केनिया, ऑस्ट्रेलिया, नेपाळ आणि श्रीलंका या देशांतील दोन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भिवंडी येथील ऑल स्पोर्ट्स कराटे-डु फाउंडेशन आणि भिवंडी यूथ स्पोर्ट्स अकादमीमधील १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यांनी मिळवलेल्या सात सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भिवंडीचा मान उंचावला आहे. या विजेत्या खेळाडूंचा लिटिल चॅम्प शाळेच्या प्रमुख खिलना शाह व कल्पेश शाह, मास्टर अली मेमन, फिरोज मेमन, अरविंद जैसवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या द्यार्थ्यांना प्रशिक्षक अली मेमन, अंबर मेमन, सर्वेश साहनी, सालिक अन्सारी, आफताब आणि अरकम यांनी मार्गदर्शन केले.

भिवंडी : आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भिवंडीतील खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT