मुंबई

महिला क्रिकेटपटुंसाठी विद्यार्थ्यांची विजयी रॅली

CD

महिला क्रिकेटपटूंसाठी विद्यार्थ्यांची विजयी रॅली
साकीनाक्‍यातील समता विद्या मंदिर शाळेत जल्‍लोष
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः दक्षिण आफ्रिकेवर रोमांचक विजय मिळवत भारताने महिला क्रिकेट विश्वकप २०२५ आपल्या नावावर केला. या भव्य कामगिरीने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्वत्र जल्लोष सुरू आहे. या विजयाचा उत्सव साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेतदेखील उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात भारताचा तिरंगा आणि महिला क्रिकेट टीमचे अभिनंदन करणारे फलक घेत संपूर्ण परिसरात विजयी रॅली काढली. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हो भारतीय महिला क्रिकेट टीम, अशा घोषणांनी शाळा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देशाच्या विजयाचा आनंद झळकत होता. शाळेचे सचिव राजेश सुभेदार आणि कार्याध्यक्ष ज्योती सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमानाची भावना दृढ करणे आणि महिला खेळाडूंच्या यशाचे प्रेरणादायी उदाहरण पुढे ठेवणे हा होता. कार्यक्रमात शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनीही सहभाग घेत विजयी महिला क्रिकेट टीमचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death: धक्कादायक घटना! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Pune News: मावळमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये थेट लढत; पंधरा जागांसाठी ४० जण रिंगणात, जिल्हा परिषदेचे १३, पंचायत समितीचे २७ उमेदवार!

Baramati Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCAने दिले अपडेट्स

Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी ! अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू, बारामतीत लॅंडिंग दरम्यान दुर्घटना

Solapur politics: साेलापूर जिल्ह्यात ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात; पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ जणांनी थोपटले दंड; मातब्बरांची माघार!

SCROLL FOR NEXT