मुंबई

दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले

CD

दुबार मतदानावरून मनसेची भाजपवर टीका

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः मतदार याद्यांमधील घोळ, दुबार नोंदी आणि मतचोरीच्या आरोपांवरून आता भाजपच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजप नेते आशीष शेलार यांच्या वक्तव्यामुळे दुबार मतदारांचा मुद्दा भाजपला माहीत होता, असे अप्रत्यक्षरीत्या मान्य केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अलीकडेच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी महाविकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांबाबत दुबार मतदारांच्या तक्रारींचा उल्लेख केला होता. याच वक्तव्यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भ्रष्टाचारावर बोट ठेवलं की भाजप चिडतो, कारण जिथे बोट ठेवतो, तिथे भाजपच सापडतो. जनतेच्या प्रश्नांना उत्तर न देता दिशाभूल करायची ही त्यांची सवय झाली आहे, अशी टीका मनसे नेते राजू पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, दुबार मतदारांचा मुद्दा ठाणे आणि कल्याणमधील आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकतो. नागरिक आणि विविध पक्षांच्या नेत्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : सत्तेसाठी टोकाचे राजकारण; विरोधकांचा पत्ता कापण्यासाठी अनधिकृत बांधकाम ठरणार हत्यार

IPL 2026: सॅमसनमुळे ऋतुराजचे सलामीचे स्थान गेले...! अश्विनने निवडलेल्या CSK च्या प्लेइंग १२ मध्ये दिसेल नवीन ओपनिंग जोडी

VIDEO: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल

Lionel Messi India Tour : 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी लिओनेल मेस्सीला किती कोटी रुपये मिळाले? पोलिस तपासात आयोजकाचा खुलासा

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार

SCROLL FOR NEXT