डोंबिवलीत बेकायदा वॉशिंग सेंटर
पालिकेच्या पाइपलाइनवरून पाण्याचा अनधिकृत वापर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः शहराबाहेर बेकायदा वॉशिंग सेंटरचा सुळसुळाट झाला असताना आता डोंबिवली शहरातदेखील त्यांचा शिरकाव झाला आहे. ९० फिट रोडवर नव्याने वॉशिंग सेंटर सुरू झाले असून, विशेष म्हणजे यासाठी पालिकेच्या शौचालयाच्या पाइपलाइनवरून पाणी घेतले जाते. एकीकडे शहरात काही भागांत पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असताना दुसरीकडे सर्रास पाण्याची उधळपट्टी सेंटरमार्फत सुरू असल्याचे दिसून येते.
ठाकुर्ली येथील ९० फिट रोडलगत फुटपाथवर वॉशिंग सेंटर काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे शौचालय या भागात असून, याच्या बाजूलाच उघड्यावर हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. हे वॉशिंग सेंटर सुरू करण्यास कोणी परवानगी दिली, याविषयी तेथील कर्मचारी काही प्रततिक्रिया देत नाहीत. या सेंटरकडून थेट पालिकेच्या मुख्य पाइपलाइनवरून अनधिकृत पाणी घेऊन मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याचे दिसत आहे.
सध्याच्या परिस्थितीत शहरात दरदिवशी काही भागांना मर्यादित वेळेत पाणी मिळत आहे. काही भागांत रस्त्यांची कामे सुरू असल्याने पाण्याची टंचाई, दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तर काही भागांत पाण्याचे प्रेशरच नसल्याने सोसायट्यांना टॅंकरचा सहारा घ्यावा लागत आहे. असे असताना बेकायदा वॉशिंग सेंटरवर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पालिकेकडून कारवाई नाही
नागरिकांच्या तक्रारीनुसार, ही वॉशिंग सेंटर दिवसातून शेकडो लिटर पाणी गाड्या धुण्यासाठी वापरतात. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या अनधिकृत पाणी वापरावर कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे या सेंटरना पालिकेचा मूक पाठिंबा आहे का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.