मुंबई

जे. जे.चा जेरियाट्रिक विभाग ज्येष्ठांसाठी आधार

CD

जे.जे.चा जेरियाट्रिक विभाग ज्येष्ठांसाठी आधार
६० वर्षांवरील नागरिकांना एकाच छताखाली बहुउद्देशीय उपचार
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वयानुसार मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे लक्षणीय प्रमाण वाढते. ज्यांचे निदान अनेकदा होत नाही किंवा कमी निदान होते. फक्त मधुमेह आणि उच्च रक्तदाबच नाही तर ६० वर्षांवरील नागरिकांना इतरही शारीरिक आजार उद्भवतात. ज्येष्ठांचे मानसिक, शारीरिक आणि इतर आजारांवर उपचार आणि सल्लामसलत करण्यासाठी जे. जे. रुग्णालयांतर्गत जेरियाट्रिक विभाग सुरू करण्यात आला आहे. हा विभाग त्यांच्यासाठी आधार ठरत आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या विभागात एकाच छताखाली बहुउद्देशीय उपचार दिले जातात. २०१८ पासून आतापर्यंत तब्बल २३ हजार ८१९ अधिक ज्येष्ठ नागरिकांना उपचार व सल्ला दिला गेला असून, ही ओपीडी त्यांच्यासाठी वरदान ठरली आहे. रुग्णांवर उपचारांसह समुपदेशन केले जाते. अनेकदा ज्येष्ठ नागरिक त्यांना होणाऱ्या समस्या उघडपणे वयोमानानुसार सांगणे बंद किंवा कमी करतात. लाजेपोटी शरीरात होणारे बदल सांगणे त्यांना कठीण जाते. अशा ज्येष्ठांसाठी या विभागाची ओपीडी दररोज चालवली जाते. जे. जे. रुग्‍णालयात सध्या आठ निवासी डॉक्टर (पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थी) आणि वृद्ध रुग्णांची काळजी घेण्यासाठी पाच प्राध्यापक आहेत. तर लवकरच तिसऱ्या वर्षासाठी नवीन विद्यार्थी येतील. या विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण रावत, सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन सिक्वेरिया, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मिलिंद खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम रुग्णसेवा देत आहे. दरदिवशी २० जुने आणि नवीन रुग्ण येतात.

सरकारी पाच रुग्णालयांमध्ये विभाग
सरकारच्या जीआरनुसार, प्रत्येक रुग्णालयात ज्येष्ठांसाठी जेरियाट्रिक ओपीडी असणे बंधनकारक आहे. त्यानुसार, जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदा २००६मध्ये ओपीडी सुरू करण्यात आली होती. ओपीडीला वाढता प्रतिसाद बघून डिसेंबर २०२२ पासून बहुउद्देशीय विभाग सुरू करण्यात आला. विभागात एनएमसीच्या नियमानुसार, ३५ समर्पित खाटा आहेत. जे. जे. रुग्णालय, संभाजीनगर, एफएमसी पुणे, एमजीएम नवी मुंबई, डी. वाय. पाटील नवी मुंबई या पाच रुग्णालयांमध्ये जेरियाट्रिक विभाग सुरू आहेत. या पाचही रुग्णालयांमध्ये वैद्यकीय विद्यार्थी शिकत आहेत. २००६ पासून लायन्स रोटरी क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिक ओपीडी सुरू झाली. २०११ला एनपीएससीई कार्यक्रमाअंतर्गत रिजनल जेरियाट्रिक सेंटर सुरू केले. १९ राज्यांत ही केंद्रे सुरू केली गेली.

काय आहे उद्देश?
६० आणि त्यावरील वयोगटाच्या वृद्धांना सामाजिक, वैयक्तिक, शारीरिक, भावनिक आव्हानांवर मदत करण्यासाठी हा विभाग महत्त्वाचा आहे. वृद्धापकाळात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. त्यांच्या समस्याही वेगळ्या असतात. त्यासाठी हा विभाग समर्पित कार्यरत आहे. इथल्या प्रत्येक डॉक्टरला संवादाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा विश्वास मिळवणे सोपे होते. यासह रुग्णांच्या नातेवाइकांनाही प्रशिक्षण दिले जाते. शिवाय आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या ठरावीक चाचण्या केल्या जातात.
डॉ. मिलिंद खाडे,
सहाय्यक प्राध्यापक, जेरियाट्रिक विभाग, जे. जे. रुग्णालय

रुग्‍णांसाठीच्या सेवा
* दररोज सकाळी ९ ते दुपारी १ ओपीडी
* संपूर्ण देशात मदतीसाठी हेल्पलाईन - १४,५६७
* भविष्यात आपातकालीन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न
* ज्येष्ठांना चालण्यासाठी छडी, ऐकू येण्यासाठी मशीन, सामाजिक विभागाकडून औषधांचा नि:शुल्क पुरवठा

कोणत्या आजारांसाठी विभाग कार्यरत -
डिमेंशिया, पक्षाघात, अनियंत्रित मधुमेह, पोषणाअभावी हिमोग्लोबिन कमी होणे, मलेरिया, डेंग्यू

सध्या सहा खाटा या विभागाला देण्यात आल्‍या आहेत. विभागाच्या वॉर्डचे सुरू असलेले नूतनीकरण लवकरच पूर्ण होईल. बहुउद्देशीय उपचार आणि सल्ला या विभागात रुग्णांना मिळताे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने हा विभाग सुरू करण्यात आला आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने हा विभाग कार्यरत असेल.
- डॉ. अजय भंडारवार,
अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Pune News : भाजपने कंबर कसली! मोहोळ, बीडकर, लांडगे, कुल आणि जगताप यांच्याकडे दिली महत्वाची जबाबदारी

Farmer Fraud : ऊसतोड कराराच्या नावाखाली बार्शीच्या शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक; मुकादमा विरोधात गुन्हा दाखल!

Pune Fraud : मांत्रिकाकडून दांपत्याची १४ कोटींची फसवणूक; इंग्लंडमधील घरासह सर्व संपत्ती विकण्यास भाग पाडले

Pali Public Protest : पाली नगरपंचायतच्या जुलमी करवाढीविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार; नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव देणारे निवेदन!

SCROLL FOR NEXT