दुबार मतदारांवर फुली
जिल्ह्यातील ४,१५६ नावे हटवल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ ः राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुबार किंवा तिबार नावे कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात दहा नगर परिषदांच्या मतदार यादीत ४,१५६ दुबार नावे हटवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत आणि माथेरान नगर परिषदांनी अहवाल दिले आहेत. या अहवालानुसार, ४,१५६ दुबार किंवा तिबार नावे मतदार यादीत आढळली आली. सर्व नगर परिषदांनी ही नावे हटवल्याचे नमूद केले असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम परीक्षण केल्यानंतर नगर परिषदांच्या मतदार याद्या अद्ययावत होणार आहेत.
---------------------------------
दुबार नावांपुढे दोन स्टार
ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये दोन किंवा तीन वेळा आली आहेत, त्यांच्या नावाच्या पुढे दोन स्टार करण्यात येऊन नगर परिषदांकडे अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानुसार ही नावे एकाच ठिकाणी ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
़़़़़़़़ः--------------------------------
उमेदवारांना खर्च मर्यादा
निवडणुकीतील उमेदवारांना खर्च करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. यामध्ये ब वर्ग नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ११.२५ लाख तर सदस्यपदासाठी ३.५ लाखांची मर्यादा आहे. तर क वर्ग नगर परिषद अध्यक्षपदासाठी ७.५ लाख तर सदस्यपदासाठी २.५ लाख खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
-----------------------
जिल्ह्यातील १० नगर परिषदांची निवडणूक होणार आहे. यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही आचारसंहितेचे पालन करावे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी झाली आहे. मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड
----------------------------------------
तालुका दुबार नावे
खोपोली ८९१
अलिबाग २४४
श्रीवर्धन १३१
मुरूड-जंजिरा ६९
रोहा ६२
महाड ३५९
पेण ७८४
उरण ७८१
कर्जत ८१७
माथेरान १८
एकूण ४,१५६
----------------------------------------------------
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून आढावा
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. यासाठी नगर परिषद हद्दीत आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये अलिबाग, पेण, मुरूड, रोहा, खोपोली, उरण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, माथेरान या नगर परिषदांचा समावेश आहे. या नगर परिषदांचा २०२२ मध्येच कालावधी संपला आहे; पण निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून १० नगर परिषदांमध्ये ३०८ मतदान केंद्र असणार आहेत. तसेच मतदान केंद्रांवर सुमारे १,६०० अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी-कर्मचारीही तैनात असणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
---------------------------
दोन लाख ३७ हजार ५०३ मतदार
१० नगर परिषद निवडणुकीत दोन लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदान करणार आहेत. या नगर परिषदांमध्ये सर्वांत मोठी नगर परिषद खोपोली असून येथे ६२ हजार ७४ मतदार असून सर्वांत कमी मतदार माथेरान नगर परिषदेत चार हजार ५५ मतदार आहेत.
---------------------------------
नियमावलीही जाहीर
उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे. प्रचारसभांसाठी आधीच परवानगी घेणे आवश्यक आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. लोकप्रतिनिधींचे प्रभागामध्ये नाव आहे, त्याठिकाणी मतदान करण्यास परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त लोकप्रतिनिधींना इतर कोणत्याही मतदान केंद्रांवर जाण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.