मुंबई

संघानी इस्टेट परिसरातील खड्ड्यांची पालिकेकडून दुरुस्ती

CD

संघानी इस्टेट परिसरातील खड्ड्यांची पालिकेकडून दुरुस्ती
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः घाटकोपरमधील संघानी इस्टेट परिसरातील रस्त्यावर खड्डे पडल्‍याने अपघातांची भीती व्यक्‍त करण्यात येत होती. यासंदर्भात ‘सकाळ’च्या मंगळवारच्या (ता. ४) अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत बुधवारपासून खड्ड्यांवर डांबर टाकून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
पालिका एन वाॅर्डचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. अलीकडेच पवईत खड्ड्यांमुळे तरुण दुचाकीस्वाराचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच संघानी इस्टेट परिसरातील खोल खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. परिसरातील नागरिकांनीही ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांविषयी सातत्याने तक्रारी नोंदवल्या होत्या. दुरुस्तीसाठी मनसेचे शाखाध्यक्ष गणेश पवार, सचिव चेतन भाटकर यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Latest Marathi News Live Update : श्वान चिकित्सकांच्या अधिवेशनाला मोहन भागवत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT