मुंबई

अवजड वाहनांची दादागिरी

CD

अवजड वाहनांची दादागिरी
धोकादायक पुलांवरील वाहतुकीने सुरक्षा ऐरणीवर
अलिबाग, ता. ६ (वार्ताहर)ः तालुक्यातील वढाव-खानाव मार्गावरील पूल (साकव) सोमवारी सायंकाळी कोसळला. या घटनेमुळे जिल्ह्यातील जीर्ण पुलांवरून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे भविष्यात मोठ्या संकटाला निमंत्रण दिले जात आहे.
वढाव-खानाव मार्गावरील पुलाची क्षमता १२ टनापर्यंत असताना त्याहून अधिक वजनाची वाहने बिनधास्तपणे धावत होती. अशीच परिस्थिती नवेदर बेली, सहाण-पाल्हे तसेच नवघर पुलांची आहे. आजही येथून अवजड वाहने धावत आहेत. वाहतूक पोलिसांनी बॅरिकेट लावून अवजड वाहनांना बंदी असल्याच्या सूचना दिल्या आहेत, पण वाहनचालकांकडून त्या आदेशांची पायमल्ली होत आहे, तर प्रशासनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीर्ण पुलावरून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
-----------------------------
बंदी आदेश पायदळी
- अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे, भाकरवड-देहेन या मार्गावरील नवघर पूल, सुडकोली पूल, सहाण पूल, नवेदर बेली पूल, भाकरवड-देहन रस्त्यावरील देहेन पुलाचे ऑगस्टमध्ये संरचनात्मक परीक्षण करण्यात आले होते. या पुलांची भार क्षमता पाच ते १६ टन आहे. - जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तत्काळ बंदीचा आदेश जारी केला होता. तरीदेखील नवघर, नवेदर बेली, पाल्हे येथील पुलावरून गेल कंपनीसह मोठमोठे खासगी ट्रक, डम्पर अशा वाहनांची राजरोसपणे वाहतूक होत आहे.
--------------------------------
पोलिसांची नजर
वढाव पूल कोसळण्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. वढाव पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तसेच अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर, वढाव, सहाण बायपास येथील पाल्हे, अलिबाग- रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली पुलांवरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी सांगितले.
------------------------------------
धोकादायक पुलांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ठिकठिकाणी फलक लावण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. काही पूल दुरुस्त केले आहेत. त्या पुलावरून १६ टनापर्यंतच्या वाहनांना प्रवेश आहे.
- अभिजित भुजबळ, पोलिस निरीक्षक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Eknath Shinde : चाकणला उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; लाडकी बहिण योजना बंद होणार नाही!

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT