मुंबई

पालघरचा ''तारपा'' नागपुरात गाजला

CD

पालघरचा ‘तारपा’ नागपुरात गाजला

आदिवासी यूट्युब कलाकारांना ‘मिस्टर नागपूर’चा मान

कासा, ता. ६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पालघरमधील आदिवासी यूट्युब कलाकारांनी नागपूर येथे झालेल्या पहिल्या-वहिल्या ‘ट्रायबल फॅशन शो’ मध्ये आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल केले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत रवी सातपुते यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘मिस्टर नागपूर’ हा किताब मिळवला, तर किरण वरठा यांनी तिसरा क्रमांक मिळवत ‘सेकंड रनर-अप’चा मान मिळवला. तसेच, लक्ष्मी सातवी आणि पायल वरठे या कलाकारांनी सादर केलेल्या ‘तारपा नृत्य’ला प्रथम पारितोषिक मिळाले.

जय सेवा नागपूर संस्थेचे प्रफुल्ल धुर्वे यांच्या पुढाकाराने २ नोव्हेंबर २०२५ रोजी हा पहिला ट्रायबल फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बस्तर आणि गडचिरोलीसह देशभरातील ४५पेक्षा अधिक आदिवासी जमातींनी आपापली समृद्ध संस्कृती, पारंपरिक पोशाख आणि नृत्य यांचे प्रदर्शन या सोहळ्यात केले. या सोहळ्यात पालघरमधून रवी सातपुते, किरण वरठा, पायल वरठे, लक्ष्मी सातवी, नितीन दिवा आणि आकाश दांडेकर या कलाकारांच्या चमूने सहभाग घेतला. त्यांनी पारंपरिक तारपा नृत्य आणि आदिवासी पोशाख सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. यामुळे पालघरच्या संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला.

या यशाबद्दल बोलताना रवी सातपुते म्हणाले, “आम्ही केवळ स्पर्धा जिंकण्यासाठी नाही, तर आपल्या संस्कृतीचा अभिमान जपण्यासाठी हे सादरीकरण केले. आज आमच्या कला आणि मेहनतीला राष्ट्रीय मंचावर गौरव मिळाला, हे आमच्यासाठी मोठे यश आहे. मी शिक्षक म्हणून एका शाळेत काम करीत आहे. तारपा वाजवण्याचे शिक्षणदेखील फावल्या वेळेत फुकटमध्ये देत आहे.”

---
बोलीभाषा आणि संस्कृतीचा प्रचार

पालघरचे हे यूट्युब कलाकार शॉर्ट फिल्म, ब्लॉग, गाणी आणि समाजप्रबोधनात्मक रील्सच्या माध्यमातून आपल्या बोलीभाषा आणि संस्कृतीचा प्रचार करत आहेत. त्यांनी केवळ मनोरंजन नव्हे तर समाजजागृती आणि सांस्कृतिक जतनाचे कार्य सुरू ठेवले आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी युवक-युवती यूट्युब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर आपल्या कलेचे दर्शन घडवत आहेत. पारंपरिक गाणी, नृत्य, लोककला आणि समाजप्रबोधनात्मक विषयांवरील व्हिडिओ तयार करून ते प्रेक्षकांचे मनोरंजन आणि शिक्षण दोन्ही करत आहेत. या माध्यमातून त्यांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबन मिळत असून, ग्रामीण भागातील तरुण पिढी याकडे उत्साहाने वळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Eknath Shinde : चाकणला उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; लाडकी बहिण योजना बंद होणार नाही!

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT