मुंबई

भिवगड किल्ला पावसाने ढासळला

CD

भिवगड किल्ला पावसाने ढासळला
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, दुरुस्तीची मागणी
कर्जत, ता. ६ (बातमीदार)ः तालुक्यातील गौरकामत परिसरातील भिवगड किल्ल्याच्या डोंगराचा काही भाग अचानक कोसळला होता. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी घसरण सुरू असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शिवकालीन इतिहासाचा भिवगड किल्ला हा महत्त्वाचा वारसा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याचा वापर होत असल्याचे ऐतिहासिक नोंदींमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. किल्ल्यावरील तटबंदीचे अवशेष, प्राचीन बांधकाम आजही दृश्य स्वरूपात असल्याने हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. भिवगड अखंड संवर्धन समितीच्या माध्यमातून स्थानिक तरुण, या किल्ल्याचे संवर्धन व स्वच्छता उपक्रम सातत्याने राबवत आहेत, मात्र यंदा झालेल्या पावसाने किल्ल्यावरील मातीचा भाग वांरवार कोसळत आहे.
------------------------
भविष्यात धोका
इर्शालवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेने राज्याला हादरवले होते. त्याच पार्श्वभूमीवर भिवगडावरही अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी शासनाने तातडीने भूगर्भ तज्ज्ञां कडूनपाहणी करून किल्ल्याच्या कड्यांचे मजबुतीकरण करण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे मत आहे. महत्त्वाचे म्हणजे, किल्ल्याच्या उत्तर बाजूस आदिवासी वाडी असल्यामुळे भविष्यात धोका वाढण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
-------------------------
अनेक वर्षांपासून भिवगडाचे संवर्धन करत आहोत. किल्ल्यावरील छोटासा भाग कोसळला असला, तरी ही घटना गंभीर आहे. शासनाने तत्काळ लक्ष घालून पुढील मोठा अनर्थ टाळण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करावी.
-ॲड. योगेश देशमुख, अध्यक्ष, भिवगड अखंड संवर्धन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी

शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Buldhana Crime : मध्य प्रदेश मधील अग्नी शस्त्र निर्मिती; गृह खात्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Junnar Leopard's : जुन्नर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवनाधिकार धोक्यात; वन विभागाला तातडीची नोटीस!

Pune News : झेडपीच्या ४६ शिक्षकांवर होणार कारवाई; दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांहून कमी

SCROLL FOR NEXT