मुंबई

महापालिकेच्या सूचना फलकाखालीच कचऱ्याचा ढिग

CD

महापालिकेच्या सूचनाफलकाखालीच कचऱ्याचा ढीग
नेरूळ सेक्टर १० परिसरातील प्रकार; अस्वच्छतेमुळे संताप
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १० येथील बुद्ध विहाराजवळ महापालिकेने कचरा टाकू नका, असा सूचनाफलक लावला असतानाच त्याच फलकाखाली मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नवी मुंबई महापालिका देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रस्थानी असून, केंद्र सरकारकडून अनेक पुरस्कारही मिळवले आहेत, मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी स्वच्छतेची स्थिती अत्यंत दयनीय असून, प्रशासनाच्या दाव्यांना तडा जात असल्याचे चित्र दिसत आहे. नेरू येथील एनएल १ आणि एनएल २ या बैठ्याचाळ भागातील रस्ते अरुंद असून, दुतर्फा वाहने पार्क असल्याने आधीच वाहतूक कोंडी असते. त्यातच रस्त्यावर कचरा साचल्याने वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे आसपास राहणारे नागरिक आणि बुद्ध विहारात प्रार्थनेसाठी येणारे अनुयायी त्रस्त झाले आहेत. काही निष्काळजी व उपद्रवी लोकांकडून रोज या ठिकाणी घरगुती तसेच बांधकामाचा कचरा टाकला जातो. महापालिकेने येथे कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा फलक लावला आहे, परंतु या सूचनांकडे कोणीही लक्ष देत नाही. उलट, सूचनाफलकाच्या खालीच घनकचरा, प्लॅस्टिक आणि ओला कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जात आहे. विशेष म्‍हणजे पालिकेने हे ठिकाण कचराकुंडीमुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले असूनही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. या ठिकाणी स्वच्छतेसाठी नेमलेले कर्मचारीही त्रस्त झाले असून, स्थानिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे या परिसरात तातडीने दंडात्मक कारवाई करून स्वच्छता राखण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी

शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Buldhana Crime : मध्य प्रदेश मधील अग्नी शस्त्र निर्मिती; गृह खात्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Junnar Leopard's : जुन्नर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवनाधिकार धोक्यात; वन विभागाला तातडीची नोटीस!

Pune News : झेडपीच्या ४६ शिक्षकांवर होणार कारवाई; दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांहून कमी

SCROLL FOR NEXT