मुंबई

माथेरान ट्रेन

CD

माथेरानच्या मिनी ट्रेनची पुन्हा धाव
पर्यटकांसह व्यावसायिकांमध्ये उत्साह

कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः माथेरानमधील डोंगररांगांमधून, दऱ्याखोऱ्यांमधून धावणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन हे या पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण आहे. विशेषतः शनिवार-रविवार आणि सलग सुट्ट्यांमध्ये या गाडीला प्रचंड गर्दी असते. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत ही सेवा सुरू केली जाते. यंदा पावसाची तीव्रता अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने ट्रॅकवरील दुरुस्तीचे काम लांबले. परिणामी, मिनी ट्रेनची धाव उशिरा सुरू झाली.
सर्व कामे मार्गी लावल्यानंतर गुरुवारी (ता. ६) सकाळी ८.५० वाजता पहिली मिनी ट्रेन नेरळ स्थानकातून मोठ्या जल्लोषात माथेरानकडे रवाना झाली. स्टेशन प्रबंधक गुरुनाथ पाटील आणि उपस्टेशन प्रबंधक धीरेंद्र सिंह यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर सकाळी १०.२५ वाजता दुसरी मिनी ट्रेनही माथेरानमध्ये दाखल झाली.
सुरक्षेच्या कारणास्तव जून ते ऑक्टोबर या पावसाळी काळात मुख्य मार्गावरील सेवा बंद ठेवावी लागते. या काळात केवळ अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवा सुरू असते; मात्र आता पुन्हा एकदा नेरळ-माथेरान ही संपूर्ण मिनी ट्रेन रेल्वे पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्याने मुंबई-पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांची पावले पुन्हा माथेरानकडे वळू लागली आहेत.
----
गाडीच्या फेऱ्या
नेरळहून सकाळी सुटणाऱ्या दोन्ही गाड्या अनुक्रमे ११.३० वाजता आणि १.०५ वाजता माथेरान येथे पोहोचतील. तर दुपारी व संध्याकाळी माथेरानहून सुटलेल्या गाड्या संध्याकाळी ५.३० आणि ६.४० वाजेपर्यंत नेरळ येथे पोहोचतील. पूर्ण क्षमतेने गाड्या धावू लागल्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा उत्साह दुपटीने वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : कारवाईच्या बहाण्याने घरात घुसले, २० लाखांसह १५ तोळे सोन्याची चोरी; चार पोलिसांना अटक

Solapur politics: साेलापूर जिल्ह्यात ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात; पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ जणांनी थोपटले दंड; मातब्बरांची माघार!

CJI SuryaKant: आरोपींसाठी शिक्षा वेदनादायक नसेल, तोपर्यंत...; सरन्यायधीशांचे मोठे संकेत! शिक्षेची तीव्रता वाढणार? मोदी सरकारही शॉक

Pune Crime: श्रीरामपूरमधील जप्त अमली पदार्थाची विक्री; पाच आरोपी ताब्यात १० किलो ७०७ ग्रॅमचा माल, वाहने हस्तगत!

रिस्क नको, BMCमध्ये सत्तेसाठी भाजप-शिवसेनेच्या सावध हालचाली; महायुती म्हणून नोंदणी करणार, अखेरच्या क्षणी निर्णय बदलला

SCROLL FOR NEXT