मुंबई

मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह

CD

रेतीबंदर खाडीत दोन दिवसांत दोन मृतदेह
कळवा, ता. ७ (बातमीदार) : ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत दोन अज्ञात तरुण मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. ६) अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी (ता. ७) सकाळी १० च्या सुमारास त्याच ठिकाणी २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. खाडीत मासे पकडणाऱ्या मच्छीमारांनी हा मृतदेह तरंगताना पाहिल्यानंतर तातडीने मुंब्रा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गेल्या दोन दिवसांत एकाच वयोगटातील तरुण महिला आणि पुरुषाचा मृतदेह एकाच ठिकाणी आढळल्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून, मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

प्राजक्ता माळीचा चेहरा सेम वडिलांसारखा, नाक, डोळे सुद्धा जसेच्या तसे, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

Love Story : एक 'ब्लाइंड डेट' ठरली प्रेमाचे कारण! महाराष्ट्रीयन-दक्षिण भारतीय संस्कृतींना जोडणारे प्रेमबंध, अवघ्या पाच महिन्यांत घेतला लग्नाचा निर्णय!

Viral Video: मॉलमध्ये अचानक बायकोची एंट्री, नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहतांच दोघींनी उपटल्या एकमेकांच्या झिंझ्या

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

SCROLL FOR NEXT