विकी-कतरिना यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन!
मुंबई, ता. ७ ः हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या आयुष्याच्या नव्या पर्वात पाऊल ठेवले आहे. कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
अभिनयातील परफेक्शन आणि व्यक्तिमत्त्वातील साधेपणा यामुळे या जोडीने चाहत्यांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. २०२१मध्ये झालेल्या त्यांच्या आलिशान विवाह सोहळ्यानंतर चाहत्यांच्या मनात एकच उत्सुकता होती, की या दोघांच्या घरात चिमुकल्याची चाहूल केव्हा लागेल? या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विकी कौशलने समाज माध्यमावर पोस्ट शेअर करीत ही आनंदवार्ता चाहत्यांपर्यंत पोहोचवली. ‘आमच्या लाडक्या बाळाचे आगमन झाले आहे. प्रेमाने आम्ही आमच्या बेबी बॉयचे स्वागत केले आहे,’ असे विकीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. काही क्षणांतच ही पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी त्यांच्या नव्या आयुष्याच्या टप्प्यासाठी शुभेच्छा देत ‘विकी-कतरिना यांच्या आयुष्यात आता नव्या सुरुवातीचं सोने पेरले गेले आहे,’ असे म्हटले आहे. कतरिना सध्या बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असून ‘टायगर ३’ आणि ‘जी ले जरा’सारख्या प्रकल्पांमध्ये ती झळकली होती. विकी कौशलने ‘छावा’, ‘सॅम बहादूर’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. विकी आणि कतरिनाच्या आयुष्यात आलेल्या या चिमुकल्या पाहुण्यामुळे त्यांच्या घरात आनंद आहे. दोघांकडून अजून बाळाचे नाव किंवा फोटो शेअर करण्यात आलेला नसला तरी चाहते या नव्या टप्प्याचा उत्सव समाज माध्यमांवर मोठ्या आनंदाने साजरा करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.