अलिबाग बसस्थानकातील स्लॅब कोसळला
सुदैवाने जीवितहानी टळली; प्रवाशांमध्ये संताप
अलिबाग, ता. ८ वार्ताह ः अलिबाग एसटी बस स्थानकातील प्रवासी प्रतीक्षा कक्ष आरक्षण कक्ष आणि कॅन्टीनजवळील स्लॅब शुक्रवारी (ता.७) सायंकाळी कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेने स्थानकातील इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अलिबाग बसस्थानक १९६१ मध्ये बांधण्यात आले. या स्थानकाच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सात हजार ६३० चौ. फुट इतक्या क्षेत्रात बसस्थानक बांधले जाणार होते. तळमजला, पहिला मजला अशा पद्धतीने स्थानकात इमारत निर्माण होणार होती. त्यामध्ये चालक वाहकांसाठी विश्रांती कक्ष, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, १४ फलाट आणि प्रतीक्षालय बांधले जाणार होते. मात्र भूमिपूजन होऊन सहा वर्ष होत आली तरी अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे अलिबाग स्थानकाचा कारभार जुन्याच इमारतीमध्ये सुरू आहे.
जुन्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली असून वारंवार कोसळण्याचे संकट कायमच. आहे. पावसाळ्यात स्थानकाला गळती लागण्याचे प्रकार घडत असतात. शुक्रवारी सायंकाळी याच उपहारगृहाच्या बाहेर भागात भागातील स्लॅब अचानक कोसळला. हा भाग कायमच वर्दळीचा असतो. सुदैवाने स्लॅब कोसळला त्यावेळी कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. त्यामुळे तत्काळ नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.