जलसंकटाचे सावट
पोलादपूर तालुक्तील प्रलंबित धरणांचा प्रश्न दुर्लक्षित
पोलादपूर, ता.८(बातमीदार)ः पोलादपूर तालुक्यातील ४,५२५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी धरणांअभावी पोलादपूरमधील पावसाचे पाणी थेट नदीद्वारे वाहून जात असल्याने उन्हाळ्यात तीव्र टंचाईचे सावट उद्भवणार आहे.
पोलादपूर तालुक्यातील ७६ गाव १३४ वाड्यांसाठी २१० योजनांचा २०२४ च्या वार्षिक पाणी टंचाई आराखडामध्ये समावेश करण्यात आला होता या मध्ये टँकरने ४३ गावे ८१ वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३१ लाखांचा खर्च दाखवण्यात आला होता. पण पोलादपूर तालुक्यातील प्रलंबित धरणाची कामे मार्गी लागल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होऊन तालुक्यातील पाणी टंचाईवर होणार लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे. मात्र याकडे होणारे दुर्लक्ष विकासाला मारक ठरत आहे.
-----------------------------------
उपयुक्त साठा कमी
देशातील धरणांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या पिण्याचे पाणी, ग्रामीण भागात सिंचनाच्या माध्यमातून अन्नधान्याची सोय झाल्याने त्यांना जलमंदिर म्हंटले जाते. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीत बांधलेली शंभर वर्षांपूर्वीची धरणे अजूनही सुस्थितीत आहेत. पण त्यानंतरच्या काळात बांधलेल्या धरणांना ‘घरघर’ लागली आहे. पुराच्या पाण्याच्यासोबत वाहून येणारा गाळ, धरण उभारणीमधील त्रुटींमध्ये उपयुक्त साठा कमी झाला आहे.
---------------------------------------
...तरच संकटावर मात
स्थानिक पातळीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी गावच्या विकासात्मक कामामध्ये रस्ते सभामंडपप्रमाणे जलमंदिर विधन विहिरी कूपनलिकाची मागणी करणे गरजेचे आहे
आज गावगावात ज्या प्रमाणे इतर कामे करण्यात येतात. त्याच धर्तीवर विहीर, बंधारे, तलाव उभारल्यास गावात मुबलक पाणी उपलब्ध होईल. तसेच शेतीमध्ये नव नवीन पिके घेता येणे शक्य होणार आहे.
---------------------------
धरण प्रशासकीय मान्यता झालेला खर्च आवश्यक निधी
किनेश्वरवाडी ७६४.५० ३५९.०० ४०५.५०
लोहारखोंडा १२०८.८५ २१६.२३ ९९२.६२
कोतवाल ११६४.८८ १.०४ ११६३.८४
कोंढवी १३५६.८९ - १३५६.८९ जलसंकटाचे सावट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.