मुंबई

सर्वोदय एस टी थांबा हलवण्यास विरोध

CD

सर्वोदय एसटी थांबा हलवण्यास विरोध
प्रवाशांमध्ये नाराजी, घाटकोपर प्रगती मंचचा आंदोलनाचा इशारा
घाटकोपर, ता. ८ ः घाटकोपर पश्चिमेतील हुतात्मा बाबू गेनू सैद सर्वोदय एसटी बस थांबा हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप घाटकोपर प्रगती मंचकडून करण्यात येत आहे. झायनोव्ह रुग्णालयातील रुग्णवाहिकांना ये-जा करताना अडचण येते, या कारणावरून स्टँडची जागा बदलली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जुन्या एसटी थांब्‍याच्या अगदी काही फुटांवरच एसटी थांब्‍याची नवीन प्रतिकृती उभारण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एसटी थांबा हटवण्यामागे कोणाचा फायदा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
घाटकोपर पश्चिम परिसरात सांगली, सातारा, जुन्नर, आंबेगाव आणि पुणे भागातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांपासून या भागातील प्रवाशांसाठी हा एसटी थांबा महत्त्वाचा ठरला आहे. ९ ऑगस्ट २०२१ रोजी मोठ्या आंदोलनानंतर थांब्‍याचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्या वेळी या थांब्‍याचे ‘हुतात्मा बाबू गेनू सैद’ असे नामकरण करण्यात आले होते. मात्र चार वर्षांनंतर पुन्हा एकदा थांबा हलवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोप केला जात आहे. थांबा हलवल्‍यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घाटकोपर प्रगती मंचचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडे यांनी दिला आहे.

रुग्णालयातील रुग्णवाहिकांना ये-जा करताना अडथळा जाणवत असल्याने थांबा काही अंतरावर हलवला जात आहे. थांबा हटवला जात नाही तर नव्या रचनेत पुन्हा तयार केला जात आहे. संबंधित विकसक आपल्या खर्चातून नवीन थांबा उभारत आहे.
- गजानन बेल्लाळे,
सहाय्यक आयुक्त, एन विभाग

हा थांबा मोठ्या संघर्षानंतर मिळवला. आता तो फक्त १०-१२ फूट हलवून ठेवण्यात काय अर्थ आहे. विकसकाच्या सोयीसाठी मूळ जागेवरून थांब्‍याला बाजूला केले जात आहे. पूर्वीच्या ठिकाणीच थांबा हवा अन्यथा आमची भूमिका आंदोलनाची असेल.
- ॲड. सुदाम शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT