मुंबई

ठाणेकरांचे ‘स्नो पार्क’ स्वप्न अधांतरीच

CD

ठाणेकरांचे ‘स्नो पार्क’ स्वप्न अधांतरीच
प्रकल्प पुन्हा रखडला; ठेकेदारांचा प्रतिसाद नाही
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणेकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन देणारे स्नो पार्क आणि ॲम्युझमेंट पार्क उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून कागदोपत्रीच अडकला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून ॲम्युझमेंट पार्क उभारण्याचे ठरले होते; मात्र त्यासाठी जाहीर केलेल्या निविदेला एकाही इच्छुक ठेकेदाराने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या बहुचर्चित प्रकल्पाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न ठाणेकरांनी विचारला आहे.
ठाणे महापालिकेने २०१६ मध्ये या प्रकल्पाचा प्रस्ताव प्रथम मंजूर केला होता. या माध्यमातून नागरिकांना बर्फावर आधारित खेळांचा आनंद, विज्ञानाच्या माध्यमातून बर्फाच्छादित प्रदेशांविषयी माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. या पार्कसाठी कोलशेत येथील आरक्षण क्रमांक पाच या भूखंडावरील सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले होते. परंतु, प्रकल्प अनेक वर्षे रखडला गेला. अखेर २०२३ मध्ये नव्या प्रस्तावानुसार स्नो पार्कसोबत ॲम्युझमेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संयुक्त प्रकल्पासाठी एक लाख ५० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ राखीव ठेवले असून, त्यात पूर्वीची आरक्षित जागा आणि एचसीएमटीआर क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या मनोरंजन उद्यानांप्रमाणे अनुभव देण्यासाठी या पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

प्रस्तावित आकर्षणांमध्ये पुढील सुविधा असतील
थ्रिल राइड्स : ड्रॉप टॉवर, डिस्को कोस्टर, जायंट व्हील, पेंड्युलम, फँटसी प्लॅनेट
फॅमिली राइड्स : कॉफी कप, सन अँड मून, सिक्स रिंग रोलर कोस्टर, कोरीजील, स्टिंग टॉवर (४५ मीटर)
इतर सुविधा : फूड पार्क, शॉपिंग झोन, एक्झिबिशन हॉल, बॅन्क्वेट हॉल, ९डी सिनेमा, हॉरर हाऊस, इको पार्क, नेचर ट्रेल, हॅप्पी स्ट्रीट आणि प्रशस्त पार्किंग प्लाझा. हा प्रकल्प पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) म्हणजेच खासगी सहभागातून उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

जाचक अटींमुळे निविदा रद्द
महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, अटी आणि शर्ती अतिशय जाचक असल्याने कोणत्याही ठेकेदाराने अर्ज दाखल केला नाही. त्यानंतर प्रशासनाने अटींमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू केले असले तरी अद्याप अंतिम मसुदा तयार झालेला नाही. अटींमध्ये बदल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

प्रकल्पाचा प्रवास
२०१६ : महापालिकेची प्राथमिक मान्यता
२०१८ : निविदा जाहीर, पण प्रतिसाद नाही
२०२३ : सुधारित प्रस्ताव - अ‍ॅम्युझमेंट + स्नो पार्क
२०२५ : अटींचे पुनर्मूल्यांकन सुरू, निविदा अद्याप प्रलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT