मुंबई

शेतकऱ्यांच्या जीवनात गटशेतीमुळे सकारात्मक बदल

CD

मुरबाड, ता. ८ (वार्ताहर) : कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा मुरबाड येथील अविनाश बोंबे सभागृह, वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी संदीप केणे यांनी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमाविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी (अंबरनाथ) क्षीरसागर यांनीही शेतकऱ्यांना प्रेरणादायी सूचना दिल्या.
कार्यशाळेत पाणी फाउंडेशनचे तज्ज्ञ संदेश कारंडे, प्रशिक्षक अवधूत गुरव आणि लहुराज दरेकर यांनी ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गटशेतीचे फायदे स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केली, तर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो. कृषी विभागाचे कर्मचारी कोच म्हणून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत राहिले, तर उत्पन्नवाढ आणि जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला कल्याण उपविभागाचे कृषी अधिकारी अशोक गायकवाड, सर्व उपकृषी अधिकारी मुरबाड व अंबरनाथ, सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) आणि काही गटशेती करणारे शेतकरी उपस्थित होते. कार्यशाळेद्वारे ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून शाश्वत शेती, गटआधारित उत्पादन आणि जलसंवर्धनाबाबत अधिकारी व शेतकऱ्यांना मौल्यवान मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT