मुंबई

आंदोलनकर्त्यांवर कर्मचाऱ्यांवर गुन्हा नाही!

CD

आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नाही!
मोटरमनची केबिन बंद करून आंदोलन; प्रवासी संघटना आक्रमक

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सीएसएमटी स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मोटरमनच्या केबिनचे दार बंद करून मोटरमन आणि गार्डला आत कोंडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या कृत्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली आणि हजारो प्रवासी अडकले. समाजमाध्यमावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे युनियनचा ‘असा काही प्रकार झालाच नाही’ हा दावा फोल ठरला आहे. धक्कादायक म्हणजे घटनेला ४८ तास उलटूनही कोणत्याही कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. सामान्य नागरिकांनी असे केले असते तर पोलिसांनी त्यांना क्षणात तुरुंगात टाकले असते; मग रेल्वे कर्मचाऱ्यांना सूट का, असा संतप्त सवाल प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

मुंब्रा अपघातप्रकरणी गुरुवारी (ता. ६) दोन अभियंत्यांवरील दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय ‘सीएसएमटी’ स्थानकावर आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे तब्बल एक तास लोकल वाहतूक ठप्प झाली आणि या गोंधळात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. इतकी गंभीर घटना घडूनही जबाबदार आंदोलनकर्त्यांवर अजूनही गुन्हा नोंदविण्यात आला नाही, ही बाब प्रवासी संघटनांच्या रोषाला आणखी खतपाणी घालत आहे. सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी या आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. मध्य रेल्वेनेही स्वतःचा अहवाल मागवला आहे. पण ४८ तास उलटूनही कोणावरच कारवाई न झाल्याने रेल्वे प्रशासनाची निष्क्रियता आणि कर्मचाऱ्यांवरील माया स्पष्टपणे दिसून येत असल्याची टीका प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.


व्हिडिओने उघड केले सत्य!
रेल्वे आंदोलनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही कर्मचारी मोटरमनच्या केबिनसमोर उभे राहून दार अडवून असल्याचे स्पष्ट दिसते. युनियनने असा प्रकार झालाच नाही, असा दावा केला होता. परंतु व्हिडिओने सर्व दावे धुळीस मिळवले आहेत. प्रवासी संघटनांनी तत्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना वाचवले जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. मध्य रेल्वे आणि जीआरपी दोन्हींकडून अहवाल वरिष्ठ स्तरावर पोहोचला असला तरी कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी रेल्वे स्वतःच चौकशी लांबवतेय का, असा थेट सवाल प्रवासी संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

परवानगीशिवाय आंदोलन?
‘सामान्य प्रवासी संघटनांना सीएसएमटी स्थानकात तर सोडा, स्थानकाबाहेरही आंदोलनासाठी परवानगी मिळत नाही. मग रेल्वे कर्मचारी संघटनांना ‘सीएसएमटी’सारख्या संवेदनशील ठिकाणी आंदोलन कसे करता येते? गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कर्मचारी संघटनांचे ठिय्या आंदोलन सुरू असते, पण आजवर कोणीही मोटरमनची लॉबी अडवली नव्हती. मात्र या वेळी पहिल्यांदाच मोटरमनच्या केबिनचे दार बंद करून लोकल वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे या घटनेमागे नेमके कोणाचे षड्‍यंत्र आहे, हे रेल्वे प्रशासनाने तपासून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.

सीएसएमटी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलनकर्त्यांवर कारवाई करावी. पण ४८ तास उलटले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. रेल्वेने आता तत्काळ कृती करावी अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केले असते तर जीआरपी आणि आरपीएफने लगेच गुन्हा दाखल केला असता, पण रेल्वे कर्मचारी आंदोलन करतात तेव्हा पोलिस गप्प राहतात. ही हुकूमशाही नाही का? गर्दीच्या वेळी संप पुकारून लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा सर्व प्रवासी संघटना एकत्र येऊन मोठा लढा उभारतील.
- उमेश विशे, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT