मुंबई

गटाराचे घाण दुर्गंधी युक्त पाणी नागरिकांच्या दारी

CD

गटाराचे घाण पाणी नागरिकांच्या दारी
मालाड, ता. ९ (बातमीदार) : मालवणी परिसरात गटाराच्या घाण पाण्याचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून कायम आहे. नवीन कलेक्टर कंपाउंड, गेट क्रमांक ७, प्लॉट क्रमांक ३३, हाथी गार्डनसमोरील घरांच्या दारात हे पाणी साचले असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
गटाराचे पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे, तसेच नागरिकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. रहिवाशांनी वारंवार पालिकेकडे (पी उत्तर विभाग) तक्रारी करूनही केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्‍यान, पालिका प्रशासनाने तातडीने गटाराची स्वच्छता करून गाळ काढावा, पाण्याचा निचरा करावा, तसेच औषध व धूर फवारणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी सलीम कुरेशी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी दुर्घटना टळली! पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

पुण्यात भाजपचा महापौर ठरला! अजितदादांनी दिलेला शब्द NCPने पाळला, फडणवीसांसोबत झाली होती चर्चा

Nagpur News: टीईटीने केली तीन हजारांवर शिक्षकांची कोंडी! अनुकंपाधारकांना पाच वर्षांची अट; अन्यथा सेवा प्रथम नियुक्तीपासून धरणार!

Pune Crime : दुर्दैवी अंत! ४ महिन्यांच्या मुलीसह मायलेकांनी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन; पाबळमधील हृदयद्रावक घटना

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित

SCROLL FOR NEXT