एकाला दारूसह अटक
ठाणे : विनापरवाना देशी दारू बाळगून विक्री करताना कळव्यातील अंकुश काळे (३२) या व्यक्तीस कळवा घोलाईनगर येथे पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन हजार ८० रुपयांच्या ५२ देशी दारूच्या बाटल्या तसेच रोख २१० रुपये असा दोन हजार २९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई ८ नोव्हेंबर रोजी कळवा पोलिसांनी केली असून, पुढील तपास कळवा पोलिस करत आहेत.
दीड लाखाचा टेम्पो चोरीला
ठाणे : दिवा नाक्यावरील रोडच्या कडेला पार्क केलेला टेम्पो चोरीला गेला आहे. त्या टेम्पोची किंमत दीड लाख रुपये असून, ही घटना ४ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान घडली आहे. याप्रकरणी व्यापारी संतोष सिंग (५१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाहनचोरीचा गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
प्रवासात तरुणीची बॅग चोरीला
ठाणे : सीएसएमटी सुपर एक्स्प्रेसने भुसावळ ते ठाणे रेल्वेस्थानकात झोपून प्रवास करताना मुंबईतील पोस्टमन २९ वर्षीय तरुणीची बॅग चोरीला गेली आहे. त्यामध्ये १३ हजार रुपयांचा मोबाईल, साडेसात हजार रुपयांचे तीन घड्याळे, रोख दोन हजार, घरगुती वस्तू व इतर महत्त्वाची कागदपत्रे असा २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ५ ते ६ नोव्हेंबरदरम्यान चोरीला गेला आहे. याप्रकरणी शनिवारी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.