भरदिवसा दुकानात चाकू हल्ला
गुन्हा दाखल
उल्हासनगर, ता १० (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये कॅम्प क्रमांक ३ मधील बाल्कनजी बारी परिसरात एका पानटपरी चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुलनगर परिसरात राहणारे पन्नालाल जयस्वाल हे नानक जीरा चौक येथे “कनक जनरल स्टोअर” या नावाने पानटपरी चालवतात. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास करण लबाना नावाचा तरुण दुकानात आला. अचानक त्याने काउंटरवरील चॉकलेटची बरणी पन्नालाल यांच्या दिशेने फेकून मारली आणि खिशातून चाकू काढून त्यांच्या दिशेने फिरवला. सुदैवाने पन्नालाल यांनी वेळेवर बचाव केल्याने ते थोडक्यात बचावले. यानंतर संतापलेल्या करणने लाथा-बुक्क्यांनी पन्नालाल यांना बेदम मारहाण केली. जाताना त्याने “तेरे लडके आये तो उनको बोल देना, करण आया था, मैं उसका मर्डर कर दूंगा” अशी धमकी दिली. या घटनेनंतर पन्नालाल जयस्वाल यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. करण लबाना हा गुरु तेज बहादूर कॉलनीत राहणारा असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.