मानकोली उड्डाणपूल धोबीघाट
पुलावर सतरंज्या, पायघड्यांची वाळण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : डोंबिवली-ठाणे मार्गावरील मानकोली उड्डाणपूल स्थानिक वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा मानला जातो. रोज शेकडो वाहने आणि कामासाठी निघालेले नागरिक या पुलाचा वापर करतात; मात्र काही दिवसांपासून या पुलावर वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे. वाहतूक सुधारण्यासाठी बांधलेला हा पूल आता “धोबीघाट” बनल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
उड्डाणपुलावर मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांची मक्तेदारी सुरू आहे. लग्नसमारंभ वा कार्यक्रमांसाठी वापरले जाणाऱ्या मंडपाच्या सामानातील सतरंज्या, पायघड्या, कापड पुलावर वाळवण्यासाठी टांगले जात आहेत. पुलाच्या रेलींगवर, संरक्षक भिंतीवर मोठमोठ्या सतरंज्या टांगण्यात येत आहेत. यामुळे पुलाचे सौंदर्यच नाहीतर सुरक्षादेखील धोक्यात आली आहे.
पुलावरून वाहनांची ये-जा सुरू असताना वाऱ्याने एखादे कापड उडून ते गाड्यांवर आले, तर मोठा अपघात घडू शकतो. सकाळ-संध्याकाळ या पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी तरुण मंडळी येथे रील बनविण्यासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी येतात. वाहनांच्या वेगाचे कोणतेही नियम न पाळता ही तरुण मंडळी येथे वेगाने वाहन हाकत असतात. पुलावर मद्यपान करण्यासाठीदेखील अनेक तरुण मंडळी बिनधास्त उघड्यावर बसलेली असतात, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
मद्यपींचा थरार
मद्यपी तरुणांमुळे महिलांना, परिवाराला येथे फेरफटका मारण्यासाठी किंवा मोकळ्या हवेत बसण्यासाठी सुरक्षित असे वातावरण मिळत नाही. त्यातच आता पुलाच्या रेलींगवर, कठड्यावर मंडपवाले मंडपातील कापड वाळवण्यासाठी टाकत असल्याने पुलाचे सौंदर्य बिघडले आहे. नागरिकांच्या मते उड्डाणपूल सार्वजनिक सुविधेसाठी आहे. इथे धोबीघाट चालवण्यासाठी नाही. जागरूक नागरिकांनीदेखील याचे भान ठेवून आपण कोठे काय करतो याचा विचार करायला हवा. तसेच प्रशासनानेदेखील पुढे असे प्रकार वाढण्यापेक्षा याला वेळीच आळा घातला पाहिजे, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.