मुंबई

माणगावच्या अजिंक्य कापचा अभिमानास्पद पराक्रम

CD

माणगावच्या अजिंक्य कापचा अभिमानास्पद पराक्रम
मलेशियातील हाफ आयर्नमॅन फिनिशर म्हणून यश
माणगाव, ता. १० (वार्ताहर) ः माणगावचा तरुण खेळाडू अजिंक्य बाळकृष्ण काप यांनी मलेशियातील आयर्नमॅन ७०. ३ लंगकावी या आशियातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धांपैकी एक स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत भारतीय क्रीडाजगतात माणगावचे नाव उज्ज्वल केले आहे. पुण्यातील एन्ड्युरन्स कॉर्नर या प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत अजिंक्यने ‘हाफ आयर्नमॅन फिनिशर’ हा किताब पटकावत अभिमानास्पद कामगिरी बजावली.
अजिंक्य हा माणगावमधील शिक्षिका व निवेदिका काप आणि कृषी अधिकारी बाळकृष्ण काप यांचे सुपुत्र आहेत. पुण्यात नोकरी सांभाळत त्यांनी कठोर सरावातून हे यश संपादन केले असून, त्यांच्या या मेहनतीचे आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेच्या दिवशी तापमान तब्बल ३८ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८८ टक्के होती, तरीही अजिंक्यने ७ तास ३ मिनिटे ५४ सेकंदात शर्यत पूर्ण केली. या पराक्रमामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवे पान लिहिले गेले आहे. या संघातील अन्य खेळाडूंमध्ये बद्रीनाथ शास्त्री, विक्रम घोडके, प्रशांत घालके यांचा समावेश होता. सर्वांनी तीव्र उष्णतेचा सामना करत संघभावना आणि जिद्दीचे उदाहरण घालून दिले. संघाचे प्रमुख प्रशिक्षक कोच रोहन कुंभार यांनी स्वतः त्यांच्या तिसऱ्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत १४ तास ५० मिनिटे १४ सेकंदात यश मिळवून नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी सांगितले, लंगकावी स्पर्धेने आमच्या तयारीची खरी परीक्षा घेतली. एवढ्या कठीण हवामानात माझ्या ट्रेनीजनी शर्यत पूर्ण केली, हेच आमचे खरे यश आहे.
............
दानपट्टा स्पर्धेत अलिबागच्या विद्यार्थ्यांची कामगिरी
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) ः सातारा जिल्ह्यातील वाई येथे नुकतीच पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय दानपट्टा स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अप्रतिम कामगिरी साकारत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे. या स्पर्धेत अलिबागच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत राज्यस्तरावर घवघवीत यश संपादन केले. आठ वर्षे वयोगटातील मुलींच्या विभागात रुद्रा विनय पिळणकर हिने एकहाती मुक्त शैली आणि दोन्हीहाती मुक्त शैली अशा दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची दुहेरी कमाई केली. तिच्या या दमदार प्रदर्शनामुळे ती संपूर्ण स्पर्धेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्याच गटात आर्य चंद्रकांत पाटील हिनेही उत्कृष्ट खेळ करत एक सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या विभागात श्लोक अतुल जाधव याने रौप्यपदक तर देवदत्त मनीष पडवळ याने कांस्यपदक मिळवून अलिबागच्या विजयश्रीत आपला मोलाचा वाटा उचलला. या सर्व खेळाडूंनी शिस्तबद्ध सराव, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यस्तरावर स्वतःची छाप पाडली. या विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रियांका गुंजाळ, सिद्धार्थ पाटील आणि वेदांत सुर्वे या प्रशिक्षकांचे अथक परिश्रम आणि मार्गदर्शन आहे. या प्रशिक्षकांनी अलिबागमधील नवोदित खेळाडूंना दानपट्टा क्रीडेतील आवश्यक तंत्र, फिटनेस आणि मनोवृत्ती घडवून दिली. स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तरीही अलिबागच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अचूक हालचाली, चपळता आणि लक्ष केंद्रीकरणाच्या जोरावर सर्वांना चकित केले. त्यांच्या या यशाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Red Fort blast Live Update : पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांबाबत व्यक्त केला शोक अन् जखमींसाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT