मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये राजकीय कोलांट्या उड्या

CD

मिरा-भाईंदरमध्ये राजकीय कोलांटी उड्या

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर नसली तर शहरात त्याचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत. यात भाजप व शिवसेना शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक सूर्यकांत म्हात्रे यांनी भाजपमध्ये तर ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख गजेंद्र रकवी व युवासेनेचे पदाधिकारी संकेत रकवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या दोन महिन्यांपासून या राजकीय कोलांट्यांना सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत त्याला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीत होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे तसेच मुदत संपलेल्या मिरा भाईंदर महापालिकेतही भाजपची एकहाती सत्ता होती. त्यामुळे साहजिकच भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र शिवसेना शिंदे गटानेही ताकद वाढविण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे शिवसेनेत जाऊन नशीब अजमावणाऱ्यांची संख्या कमी नाही.

भाजपचे काही पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले आहेत. काँग्रेसची ताकद शहरात मर्यादित असल्याने काही कार्यकर्त्यांचा अपवाद वगळला तर एकही नाव असलेला राजकीय नेता अद्याप काँग्रेसमध्ये गेलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाची राजकीय ताकद तर काँग्रेसपेक्षाही कमी आहे. परिणामी सध्या भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. माजी नगरसेवक पुन्हा आपल्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शिवाय बाहेरून पक्षात आलेलेदेखील उमेदवारीच्या अपेक्षेने गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

भाजपची धुरा नरेंद्र मेहतांवर
महापालिका निडणुकीसाठी भाजपची धुरा आमदार नरेंद्र मेहता यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पक्षाकडून तशी अधिकृत घोषणाही झाली आहे. गेल्या निवडणुकीत ९५ पैकी भाजपचे ६१ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यात नरेंद्र मेहता यांचा सिंहाचा वाटा होता. आता भाजपने शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवक आपल्यात समावून घेतले आहेत. त्यामुळे या वेळी ६१चा आकडा पार करण्याचे दावे पक्षाकडून करण्यात येत आहेत. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन असले तरी पक्षाचे बहुतांश निर्णय मेहता हेच घेत असतात. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असल्याने निवडणुकीची जबबदारी मेहता यांनाच दिली जाणार हे निश्चितच होते.

सरनाईक यांच्यावर शिंदे गटाची मदार
शिंदे गटाची संपूर्ण मदार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरच आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनीदेखील पक्षवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. माजी आमदार गीता जैन यांचे खंदे समर्थक असलेल्या काही जणांनी सरनाईक यांचे नेतृत्व मान्य करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेविका नीलम ढवण तसेच शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी नगरसेवक यांचा अपवाद वगळता ठाकरे गटाचे बहुतांश नगरसेवक आपल्याकडे वळविण्यात सरनाईक यांना यश आले आहे. विकासकामांसाठी हजारो कोटींचा सरकारी निधी मिरा भाईंदरमध्ये आणल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आहेत. शिवाय मंत्रिपदाचाही त्यांना विशेष फायदा होत आहे.

मुझफ्फर हुसेन काँग्रेसचे सर्वेसर्वा
माजी आमदार आणि प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. पक्षाची मर्यादित असलेली ताकद वाढविण्याचे त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अस्तित्व मिरा रोडच्या नयानगर व आसपासच्या परिसरापुरतेच मर्यादित राहिले होते; मात्र आपली कक्षा रुंदावण्यासाठी देशपातळीवर काँग्रेसने लावून धरलेला मतचोरीचा मुदा हुसेन यांनी मिरा-भाईंदरमध्येही प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी समाजमाध्यमांचाही ते खुबीने वापर करीत आहेत.

ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई
गेल्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले होते. सध्या ती संख्या केवळ एकवर आली आहे. अनेक पदाधिकारीदेखील पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. परंतु भाजपचे नरेंद्र मेहता व शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्याशी टक्कर देणारे नेतृत्व ठाकरे गटाकडे स्थानिक पातळीवर नाही, ही पक्षाची खरी अडचण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

Delhi Blast : दिल्लीत २९ वर्षांत किती वेळा झाले स्फोट? संपूर्ण माहिती वाचा एका ठिकाणी

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : गृहमंत्री अमित शहा यांनी आयबी प्रमुखांकडून घेतली माहिती

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

SCROLL FOR NEXT