मुंबई

महामार्गांवर मृत्यूचे सापळे

CD

महामार्गांवर मृत्यूचे सापळे
४५ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र, वर्षभरात २०९ जणांचा मृत्यू
अलिबाग, ता.१० (वार्ताहर)ः महामार्गांवर अतिवेगामुळे अथवा बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. ऑक्टोबर २०२५ पर्यंत २०९ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे, तर ५२० जण गंभीर जखमी असून, बहुतांश अपघात जिल्ह्यातील महामार्गांवर झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात सहा महामार्गांवर ४५ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहेत. यामध्ये सर्वांत जास्त ठिकाणे मुंबई-गोवा महामार्गावर आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत १८३ अपघातांमध्ये २०९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५२० जण गंभीर झाले आहेत. त्याचप्रमाणे १६५ जण किरकोळ जखमी आहेत. मर्यादेपेक्षा जास्त वेग, मद्यपान करून वाहने चालवणे, लेनची शिस्त मोडणे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा वाहतूक प्रशासनाने केले आहे.
--------------------------------------
झालेले अपघात - १८३
मृत्यूची संख्या - २०९
गंभीर जखमी - ५२०
किरकोळ जखमी - १६५

चौकट :
अपघातप्रवण क्षेत्रे
महामार्ग ठिकाणे
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे - ८
मुंबई-पुणे जुना महामार्ग - ५
मुंबई-गोवा महामार्ग - २५
कर्जत-कळंब-दिघी महामार्ग - ३
अलिबाग-वडखळ महामार्ग - ३
माणगाव-दिघी महामार्ग - १
--------------------------
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
ृः- आवश्यक ठिकाणी गतिरोधक, ट्रम्बल स्ट्रीप, वेगमर्यादा, दिशादर्शक फलक लावणे.
- शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती.
- रस्ता सुरक्षा रॅलीतून नागरिकांमध्ये जनजागृती.
- एसटीचालक, ट्रक, बसचालकांसाठी नेत्रतपासणी शिबिर.
-----------------------------
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षाबाबत चित्रफित, डिजिटल फलकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, पण नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
- अभिजित भुजबळ, जिल्हा वाहतूक निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : दिल्लीत लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्रालयाने तातडीने बैठक बोलावली

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Dharmendra News: पाच वर्षे खासदार राहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारण का सोडले? पडद्यामागं काय घडलं होतं? जाणून घ्या खरं कारण...

धर्मेंद्र यांना दाखल केलेल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचा एका दिवसाचा खर्च किती येतो? एका रूमसाठी घेतलं जातं इतकं बिल

SCROLL FOR NEXT