मुंबई

ठाणे स्थानकात डी मार्ट स्वच्छतागृहे

CD

ठाणे स्थानकात डी मार्ट स्वच्छतागृहे
सामाजिक दायित्वातून सेवा, निगा
प्रवाशांची कुचंबणा टळणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : सर्वाधिक गर्दीचे म्हणून ओळख असलेल्या ठाणे स्थानकात अत्याधुनिक, स्वच्छ शौचालये उपलब्ध करून देण्याचे दायित्व डी मार्टने स्वीकारले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती, प्रसंगी नवीन बांधून डी मार्ट ही संस्था ठाणेकर प्रवाशांना सर्व सोयीसुविधांयुक्त असे स्मार्ट स्वच्छतागृह सेवेत देणार आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत करार झाला असून, लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची विशेषत: महिला प्रवाशांची कुचंबणा टळणार आहे.

ठाणे रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, रोज आठ लाख प्रवासी येथून प्रवास करतात. १० फलाट असलेल्या या स्थानकातून मध्य आणि ट्रान्स हार्बर लोकल धावतात, तर लांब पल्ल्याच्या गाड्याही सुटतात. अत्यंत महत्त्वाचे आणि गर्दीचे स्थानक असून, या स्थानकाचा कायापालट करणारा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. यामध्ये येथील स्वच्छतागृहांचाही समावेश आहे.
ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक ते दहापर्यंत सर्वच ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध आहेत.

१० वर्षांपूर्वी फलाट क्रमांक दोनला जोडून देशातील पहिले वातानुकूलित स्वच्छतागृह बांधण्यात आले होते, मात्र या प्रयोगासह स्थानकातील सर्वच स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. वातानुकूलित स्वच्छतागृह अडगळीत गेले आहे. याला लागून असलेल्या दुसऱ्या स्वच्छतागृहातील सांडपाणी थेट फलाटापर्यंत येते. दुर्गंधीने प्रवाशांची नाकाबंदी होते. स्थानकातील काही स्वच्छतागृह ठेकेदारांमार्फत चालवली जात आहेत; मात्र मनमानी वसुली येथे सुरू असल्याचेही अनेकवेळा उघडकीस आले आहे.

मे महिन्यात याच कारणामुळे काही संतप्त प्रवाशांनी स्थानकातील स्वच्छतागृहांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली होती. समाजकंटकांडून हे कृत्य केले गेले, असा दावा या वेळी करण्यात आला असला तरी शौचायलांच्या दुरवस्थेचा मुद्दा नाकारण्यात आला नाही. त्यानंतर प्रशासनाने स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्याला साथ डी मार्ट या कंपनीने दिली आहे. सामाजिक दायित्व म्हणून डी मार्ट ठाणे स्थानाकातील स्वच्छतागृहे बांधणार असून, त्याची देखभाल, दुरुस्तीसह सेवाही देणार आहे. भारतीय आणि पाश्चात्य बैठक व्यवस्था, पाणी, स्वच्छतेची काळजी घेत मॉलमधील स्वच्छतागृहांसारखे याचे रुपडे असेल, अशी माहिती मिळते.

सध्याच्या शौचालयांची अवस्था
फलाट क्रमांक एक कल्याण दिशेला, फलाट क्रमांक दोन मध्यभागी आणि कल्याण दिशेला तसेच फलाट क्रमांक १० वरील स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे. इतर फलाटांवरील स्वच्छतागृह वापरण्याजोगी असली तरी स्वच्छतेचा आभाव आहे.

महिलांची गैरसोय टळणार
अत्याधुनिक स्वच्छतागृहांमुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अस्वच्छतेमुळे अनेकवेळा या शौचालयांमध्ये जाणे त्या टाळतात, पण ही गैरसोय येत्या काही महिन्यात दूर होणार आहे.

मॉडेलनुसार बांधकाम, सेवा
खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी रेल्वेस्थानकाची पाहणी केली. या वेळी त्यांनी डी मार्ट स्वच्छतागृहाची माहिती दिली. हे काम कधीपासून सुरू होणार याविषयी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार डी मार्ट हे त्यांच्या मॉडेलनुसार स्वच्छतागृह बांधणार आहेत. यासाठी रेल्वे प्रशासनाने जूनमध्ये परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT