मुंबई

जोगेश्‍वरीत कोकण संस्कृतीचा सोहळा

CD

जोगेश्‍वरीत कोकण संस्कृतीचा सोहळा
२० नोव्हेंबरपर्यंत भेट देता येणार
जोगेश्‍वरी, ता. ११ (बातमीदार ) ः जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर तलाव परिसरात सध्या कोकणचा सुगंध दरवळत आहे. भारतीय जनता पार्टी, जोगेश्वरी विधानसभा क्र. ६० आणि दिशा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण पर्यटन महोत्सव २०२५’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारपासून (ता. १०) या महोत्‍सवाला सुरुवात झाली असून, २० नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात कोकणची परंपरा, लोकसंस्कृती आणि कलांचा मनमोहक संगम पाहायला मिळत आहे.
कोळी नृत्याच्या तालावर सुरू झालेल्या या महोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. याबरोबर महाराष्ट्राची लोकधारा, कोळी नृत्य, मंगळागौर, सिंधुदुर्ग कलानिर्मित साईलीला दशावतार नाट्य मंडळाचे सादरीकरण, ओमकार महाडिक यांचा ‘गजर साईनामाचा’ कार्यक्रम, मराठा सन्मित्र नाट्य मंडळाचा दशावतार व मालवणी धमाल नाटक, भजनाचा डबलबारी जंगी सामना, गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ, श्री ब्राह्मण देव भजन मंडळ, होम मिनिस्टर महिलांसाठी खास स्पर्धा, श्री कलाभूषण दशावतार नाट्य मंडळाचे दशावतार नाटक, लावणी नृत्य कार्यक्रम, कराओके ऑर्केस्ट्र, दशावतार नाटक व २० नोव्‍हेंबर रोजी सांगता समारंभ होणार आहे.

भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी
दररोज महोत्सवात येणाऱ्या महिलांसाठी पैठणी लकी ड्रॉचे आयोजन केले आहे. विविध स्पर्धांमधून महिलांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. कोकण हा संस्कृतीचा खजिना आहे. या महोत्सवातून कोकणची कला, परंपरा आणि स्नेहबंध मुंबईत जिवंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जोगेश्वरी विधानसभा सरचिटणीस व दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळा लाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: टीम इंडियाला धक्का! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टार फलंदाज खेळणार नाही, कारण...

Pune Traffic: कार्तिक यात्रेनिमित्त पुण्यात उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल; पालखीमार्ग टाळण्याचं आवाहन

Pimparkhed News : बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांसाठी वनमंत्री गणेश नाईक उद्या भेटीस येणार !

Delhi Blast: आत्मघातकी हल्ला नाही! सुरक्षा यंत्रणांच्या दबावामुळे गडबडीत केला स्फोट; अपुऱ्या क्षमतेचा ब्लास्ट, सूत्रांची माहिती

Latest Marathi Breaking News : डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, पोलिस अलर्टवर

SCROLL FOR NEXT