मुंबई

पालिका शाळांमध्ये आता ‘सीक’ अभ्यासक्रम

CD

पालिका शाळांमध्ये आता ‘सीक’ अभ्यासक्रम
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘रंगीत’ संस्थेच्या सहकार्याने सामाजिक, भावनिक आणि पर्यावरणीय ज्ञान (SEEK, सीक) हा नवीन अभ्यासक्रम पालिका शाळांमध्ये सुरू केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये, भावनिक बुद्धिमत्ता आणि पर्यावरणीय जबाबदारी विकसित करणे, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
टप्प्याटप्प्याने याचा विस्तार करत पुढील काळात अकराशेहून अधिक शाळांतील तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची जडणघडण केवळ ‘परीक्षेसाठी नव्हे, तर जीवनासाठी’ होणार आहे, असा विश्वास पालिका उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी व्यक्त केला अहे. मालवणी टाऊनशिप येथे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सीक कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी रंगीतचे सह-संस्थापक सिमरन मुलचंदानी आणि करिश्मा मेनन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून कार्यक्रमाची ओळख करून दिली. हा उपक्रम निरलॉन लिमिटेड, प्रथम मुंबई एज्युकेशन इनिशिएटिव्ह आणि ओमनीअ‍ॅक्टिव्ह इम्प्रूव्हिंग लाईव्हज फाउंडेशन (आयएलएफ) यांच्या सहकार्याने राबवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: टीम इंडियाला धक्का! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टार फलंदाज खेळणार नाही, कारण...

Pune Traffic: कार्तिक यात्रेनिमित्त पुण्यात उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल; पालखीमार्ग टाळण्याचं आवाहन

Pimparkhed News : बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांसाठी वनमंत्री गणेश नाईक उद्या भेटीस येणार !

Delhi Blast: आत्मघातकी हल्ला नाही! सुरक्षा यंत्रणांच्या दबावामुळे गडबडीत केला स्फोट; अपुऱ्या क्षमतेचा ब्लास्ट, सूत्रांची माहिती

Latest Marathi Breaking News : डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, पोलिस अलर्टवर

SCROLL FOR NEXT