मुंबई

तरुणाईचे मते निर्णायक ठरणार

CD

पालघर, ता. १२ : पालघर लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत एक लाख १० हजारपेक्षा जास्त मतदारांची भर पडली आहे. या मतदारांमध्ये नवमतदारांची (१९ वर्षांपर्यंत) संख्या ६० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. या मतदारांमध्ये तरुणांचे प्रमाण ४४ टक्क्यांच्या जवळपास आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय ही माहिती असली तरी शहरी भागात तरुण मतदारांची संख्या मोठी असल्याने येत्या निवडणुकांत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्हा निवडणूक विभागाने नवीन मतदार नोंदणीसाठी गेल्या वर्षी मोहीम हाती घेतली होती. महाविद्यालयांमध्ये नवीन मतदारांसाठी कार्यशाळा आणि अनेक शिबिरे घेऊन नवीन नोंदीसाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. त्यानंतर नोंदणीचा ओघ वाढत गेला. विधानसभा निवडणुकीनंतर १४ हजार विद्यार्थी व तरुणांनी मतदार नोंदणी केली आहे. नवीन मतदार नोंदणीमध्ये १८ ते २९ वयोगटात नोंदवलेल्या नवीन मतदारांची संख्या ४४ टक्के असून, ३० ते ३९ वयोगटात नव्याने २६ टक्के, तर ४० ते ५९ वयोगटांमध्ये २९ टक्के नवमतदारांनी आपली नोंदणी केली आहे.

एकगठ्ठा मतांकडे लक्ष
निवडणुकीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी शहराकडे जावे लागते. तसेच विविध समस्या नसल्याने त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते. जिल्ह्यात काही राष्ट्रीय प्रकल्प सुरू आहे, मात्र आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगाराची संधी नसल्याने तरुण नागरिकांचे हाल होतात. परिणामी मतदारांचा रोष मतदानावेळी दिसण्याची शक्यता आहे, मात्र या तरुणाईची मते आपल्याकडे वळवण्याकडे कोणता पक्ष यशस्वी ठरतो, त्याचा विजयाचा मार्ग सोपा जाणार आहे.

पालघरमधील मतदारांचे वयोमान
वयोगट विधानसभा निवडणूक ऑक्टोबर २०२५
१८ ते १९ ४६,१९२ ६०,३२९
२० ते २९ ४,७३,३९२ ५,१०,८५४
३० ते ३९ ५,३७,९०५ ५,६७,९९९
४० ते ४९ ५,०९,०९८ ५,२६,०५०
५० ते ५९ ३,७५,०३१ ३,९१,७१६
६० ते ६९ २,१४,५०३ २,१६,७७९
७० ते ७९ ९८,८२६ ९९,११५
८० ते ८९ ३२,१८० ३१,९७६
९० ते ९९ ७,१३६ ६,९९८
१०० ते १०९ ७९० ३२९
१०९ वरील ६ ५

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र रत्ने आणि आभूषणे धोरण जाहीर

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT