मुंबई

विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवाशाची बॅग लांबवणाऱ्यांवर लोहमार्ग पोलिसांचा धडक मोहीम

CD

अडीच तासांत चोरीचा छडा
ठाणे लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः ठाणे रेल्वेस्थानकावरून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढलेल्या नाशिकच्या प्रवाशाची लॅपटॉप, कॅमेरा व रोख रक्कम असा दीड लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवताच पोलिसांनी अवघ्या अडीच तासांत चोरट्यांना पकडत मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे प्रवाशाने समाधान व्यक्त केले.
नाशिकमध्ये राहणारे मयूर अमृतकर (वय ३०) हे सोमवारी (ता. १०) कामानिमित्त ठाण्यात आले होते. काम आटोपून ते रात्री परतीच्या प्रवासासाठी विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बसले. दरवाजाजवळील त्यांच्या आरक्षित आसनाजवळ त्यांनी आपली लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर किमती दस्तऐवज असलेली बॅग ठेवली. गाडी सुटल्यानंतर बॅग पाहिली असता ती गायब असल्याचे दिसून आले. शोधाशोध केल्यानंतरही बॅग न सापडल्याने ते कल्याण स्थानकावर उतरून थेट लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली.

तपास
तक्रारीनंतर लोहमार्ग पोलिसांनी त्वरित पथक तयार करून ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व रेल्वेस्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित चोरटे ओळखले गेले व त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर पंचांसमक्ष झडती घेतली असता, चोरट्यांकडे मुद्देमालासह एकूण एक लाख ६५ हजार किमतचा मुद्देमाल सापडला. चौकशीत चोरट्यांनीच हा ऐवज विदर्भ एक्स्प्रेसमधून चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांचे कौतुक
यावर मयूर यांनी समाधान व्यक्त करत म्हटले की, अवघ्या काही तासांत आमचा ऐवज परत मिळाला. लोहमार्ग पोलिसांची ही तत्परता कौतुकास्पद आहे. लोहमार्ग पोलिसांच्या त्वरित केलेल्या कारवाईचे प्रवासी व नागरिकांनी कौतुक केले आहे.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT