मुंबई

जिल्हा परिषद शाळांची अधोगतीकडे वाटचाल

CD

जिल्हा परिषद शाळांची अधोगतीकडे वाटचाल
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचा वाढता प्रभाव; शिक्षण व्यवस्थेला आव्हान
श्रीवर्धन, ता. १२ (वार्ताहर) ः एकेकाळी ग्रामीण शिक्षणाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आज हळूहळू अस्तित्वाच्या संकटात सापडत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील परिस्थिती याचे जिवंत उदाहरण ठरत आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०४ शाळा कार्यरत होत्या, परंतु फक्त दोन वर्षांच्या अवधीत या शाळांची संख्या घटून ८६ वर आली आहे. म्हणजेच तब्बल १८ शाळा बंद पडल्या, ही आकडेवारी चिंताजनक असून, ग्रामीण शिक्षणाची अधोगती स्पष्टपणे दिसून येते.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येतो. पायाभूत सुविधा उभारणी, डिजिटल शिक्षणाचा प्रसार, वंचित घटकांतील मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. या शाळा सामाजिक न्याय व शैक्षणिक समानतेचे प्रतीक आहेत, मात्र तरीही गेल्या काही वर्षांत पालकांचा कल खासगी इंग्रजी माध्यम शाळांकडे वळू लागला आहे. श्रीवर्धनसारख्या ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची झपाट्याने वाढ होत आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, आकर्षक इमारती, वाहतुकीची सोय आणि इंग्रजी माध्यमाचा मोह या कारणांमुळे अनेक पालक आपली मुले खासगी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवू लागली आहेत. परिणामी, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती वाढली असून, अनेक ठिकाणी ‘शून्य पट’ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मामवली आणि कारीवणे कोंड येथील शाळा २०२४-२५ मध्ये बंद पडल्या आहेत. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी आज दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षण खात्याने तातडीने शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, पायाभूत सुविधा सुधाराव्यात आणि पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळांविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी स्थानिक शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
........................
प्रशासकीय पदे रिक्‍त
या अधोगतीचे आणखी एक मोठे कारण म्हणजे शिक्षकांची टंचाई आणि प्रशासनिक पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सध्या श्रीवर्धन तालुक्यात गटशिक्षणाधिकारी प्रभारी असून, विस्तार अधिकाऱ्यांच्या तीनही जागा रिक्त आहे. तर कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त असून, केंद्रप्रमुखांच्या १० जागांपैकी फक्त एक कायमस्वरूपी आहे. उर्वरित नऊ प्रभारी पदांवरच कामकाज सुरू आहे. तालुक्यातील एकूण ८६ शाळांपैकी केवळ चार पदोन्नती मुख्याध्यापक, तर २६ पदवीधर शिक्षक पदे भरलेली आहेत. उपशिक्षकांची एकूण २०४ पदे मंजूर असताना, सध्या केवळ १४९ शिक्षक कार्यरत आहेत. अवघड क्षेत्रातील आठ शाळांमध्ये पटसंख्या अत्यल्प असल्याने तेथील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT