मुंबई

वनमंत्र्यांचा मिरा-भाईंदरमध्ये जनता दरबार

CD

मिरा-भाईंदरमध्ये वनमंत्र्यांचा ‘जनता दरबार’
महापालिका निवडणुकीसाठी फुंकणार रणशिंग
भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : आगामी मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक महत्त्वपूर्ण राजकीय खेळी केली आहे. वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार मिरा-भाईंदरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. भाजपने नाईक यांची ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे, त्यामुळे मिरा भाईंदरमधील त्यांचा हा पहिला जनता दरबार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा जनता दरबार येत्या शनिवारी (ता. १५) सकाळी १० वाजता महापालिकेच्या अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

मिरा-भाईंदर शहर ठाणे जिल्ह्यात येते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र शिंदे यांचा एकही जनता दरबार अद्याप मिरा-भाईंदरमध्ये झालेला नाही. असे असताना, भाजपने पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार येथे आयोजित केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जानेवारी महिन्यात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. युती न होण्याची शक्यता गृहित धरून दोन्ही पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते आणि भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे यावेळीही शिवसेनेशी युती नको, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपने ठाणे जिल्ह्याची जबाबदारी गणेश नाईक यांच्यावर दिली आहे. त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून नाईक मिरा-भाईंदरमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, असे मानले जात आहे.

नाईकांच्या जनसंपर्काचा फायदा
पुनर्रचनेपूर्वी मिरा-भाईंदरचा समावेश तत्कालीन बेलापूर विधानसभा मतदारसंघात होता, ज्याचे प्रतिनिधित्व गणेश नाईक करत होते. त्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आजही कायम आहे. युती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी येथे नियमितपणे जनता दरबार घेतले होते आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. महायुती सरकारच्या काळात नाईक यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले असले तरी, त्यांनी ठाणे व नवी मुंबईतही जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मिरा-भाईंदरमध्ये लवकरच जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती.

सरनाईक यांचा प्रभाव
सध्या विधानसभेत मिरा भाईंदरचे प्रतिनिधित्व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता हे दोघेही करत आहेत. प्रताप सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने सरनाईक यांनी शहरात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मंजूर करवून आणला आहे, ज्याचा प्रभाव आगामी निवडणुकीत जाणवण्याची शक्यता आहे.
सरनाईक यांच्या वाढत्या प्रभावाला प्रत्युत्तर देण्यासाठीच भाजपने गणेश नाईकांना मिरा भाईंदरमध्ये पाचारण केले आहे. नाईक यांच्या जुन्या जनसंपर्काचा भाजप लाभ करून घेत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT