१०० दिवसांचा मेगाब्लॉक
निळजे रेल्वे पुलाची उंची वाढवणार
ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : ठाणे वाहतूक विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठा वाहतूक बंदीचा ब्लॉक लवकरच सुरू होणार आहे. कोळसेवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील निळजे रेल्वे पुलाची उंची वाढवण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १०० दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तत्पूर्वी मेगाब्लॉकची तयारी म्हणून या ठिकाणी वाहतूक विभागाकडून तीन दिवसांची वाहतूक बंदीची ट्रायल रन घेतली जात आहे. या तीन दिवसांमध्ये येणाऱ्या अडचणी, कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करून प्रत्यक्षात काम सुरू होण्याआधी त्या दूर केल्या जाणार आहेत.
डीएफसीसी हा भारत सरकारचा मोठा महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प आहे. कल्याण-शिळ रोड, शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे रेल्वे पुलाची उंची वाढवली जाणार आहे. भविष्यातील जड, अवजड वाहतूक निळजे रेल्वेने जाणार आहे. त्यामुळे ठाण्याची मोठ्या वाहतू्क कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. ठाण्याची वाहतूक कोंडीतून सुटका कारणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी परिसरातील वाहतुकीच्या नियोजनाची मोठी जबाबदारी वाहतूक विभागावर आली असून, यासाठी हा विभाग सज्ज झाला आहे. प्रत्यक्षात मोठ्या कामाला सुरुवात होण्याआधी वाहतूक बदलासाठी ट्रायल रन घेतली जात आहे. याकरिता वाहतूक विभागाने येथील वाहतूक तीन दिवसांसाठी बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
मेगाब्लॉकची पूर्वतयारी म्हणून वाहतूक विभागाने या ठिकाणी तीन दिवसांची वाहतूक बंदीची ट्रायल रन सुरू केली आहे. या ट्रायल रनमध्ये येणाऱ्या अडचणी, कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी त्या दूर केल्या जाणार आहेत. भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी डीएफसीसी वाहतूक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुलाची उंची वाढवली जात आहे. कल्याण-शिळ रोडवरील, शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे रेल्वे पुलाची उंची वाढवली जाणार आहे. भविष्यात जड आणि अवजड वाहतूक निळजे रेल्वे मार्गाने वळवली जाईल. यामुळे ठाण्याची मोठ्या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे.
वाहतूक विभाग सज्ज
ठाण्याच्या वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वाहतूक नियोजनाची मोठी जबाबदारी वाहतूक विभागावर आली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विभाग सज्ज झाला असून, प्रत्यक्षात मोठ्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी वाहतूक बदलांसाठी ही ट्रायल रन घेतली जात आहे.
वाहतुकीत बदल
वाहतूक बंद निळजे कमान, निळजे पूल चढण, कल्याण फाटा, काटई चौक, खोणी नाका
पर्यायी मार्ग निळजे कमान उजवे वळण, सरस्वती टेक्स्टाईल येथून उजवे वळण
ट्रायल रनचे टप्पे
पहिला टप्पा : ७, ८, ९ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला.
दुसरा टप्पा : ११, १२, १३ नोव्हेंबर असा असून सध्या सुरू आहे.
या दोन्ही टप्प्यांत वाहतूक विभागाकडून वाहतूक बंदीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निरीक्षण करून प्रत्यक्षात रेल्वे पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यावर त्या दूर केल्या जाणार आहेत.
वाहतूक बदलाचा ट्रायल रन घेण्यात आला आहे. आणखी एक ट्रायल रन घेण्यात येणार असून, या दिवसांमध्ये केलेल्या वाहतूक बदलाचे निरीक्षण करून त्यात आवश्यक बदल केले जातील. यामुळे पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होऊन नागरिक आणि वाहनचालकांना कमीत कमी त्रासाचा सामना करावा लागेल.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, वाहतूक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.