मुंबई

पेण शहरात औषध फवारणीला सुरूवात

CD

पेण शहरात औषध फवारणीला सुरुवात
स्वच्छतेसाठी प्रशासनाचा पुढाकार; नागरिकांना दिलासा
पेण, ता. १३ (वार्ताहर) : शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांकडून तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्‍यातच मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी ‘सकाळ’ वृत्तपत्रात यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पेण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे.
नगरपालिकेने शहरातील सर्व प्रभागांमध्ये औषध फवारणी मोहिमेचा प्रारंभ केला असून, मच्छर, माशी व अन्य रोगकारक कीटकांवर नियंत्रण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे व गर्दीच्या भागातील कचऱ्याचे ढीगही तातडीने हटविण्याचे काम सुरू झाले आहे. आरोग्य अधिकारी दयानंद गावंड यांनी सांगितले की, पेण शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे, मात्र नागरिकांनी व विक्रेत्यांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. विशेषतः प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असूनही काही व्यापारी व फेरीवाले त्याचा वापर करतात, हे अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शहरातील विविध ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई, असे फलक लावले आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील स्वच्छता टिकवण्यासाठी नागरिक, दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Latest Marathi News Live Update: घनकचरा विभागात पुन्हा ठेकेदाराचे दबावतंत्र

SCROLL FOR NEXT