मुंबई

डोंबिवलीत नेत्रजागृतीसाठी भव्य उपक्रम

CD

डोंबिवलीत नेत्रजागृतीसाठी उपक्रम
डोंबिवली, ता. १३ : मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अनिल आय हॉस्पिटल, महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट सोसायटी, डोंबिवलीकर ग्रुप आणि आयएमए-डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेत्ररक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक’ हा उपक्रम रविवारी (ता. १६) डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून, डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी डोंबिवलीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
रॅलीची सुरुवात सकाळी सात वाजता गणेश मंदिर रोड येथून होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थिती लावणार आहेत. समारोपानंतर अनिल आय हॉस्पिटलच्या संचालक डॉ. अनघा हेरूर यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, रोटरी व रोटरॅक्ट क्लब्स, विविध सामाजिक आणि धार्मिक संस्था, डायबेटॉलॉजिस्ट, डॉक्टर आणि डोंबिवलीतील नागरिक उत्साहाने सहभागी होणार आहेत.
या निमित्ताने डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार वेळेवर तपासणी केल्यास टाळता येऊ शकतात. चला, आपण सगळे मिळून डोंबिवलीला डायबेटीसजन्य अंधत्वमुक्त बनवूया, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाचा वेळीच नेत्रतपासणी करा आणि दृष्टी सुरक्षित ठेवा हा संदेश समाजात व्यापकपणे पोहोचवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कोर्टाने आदेश दिला म्हणून शरण आलो', जामीनावर बाहेर येताच मंत्रिपुत्राची पुन्हा 'दादागिरी'

Latest Marathi News Live Update : केऱ्हाळा जिल्हा परिषद गटात निवडणूक नात्यांची कसोटी ठरत असल्याचे चित्र

विदेशात करिअर करायचंय? वर्ल्ड बँक Pioneers Internship 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; आजच या संकेतस्थळावर क्लिक करा!

WPL Playoff Scenario : मुंबई इंडियन्स बाद फेरीत कसा प्रवेश मिळवणार? ७ पैकी जिंकलेत ३ सामने; दिल्ली, गुजरात यांच्याकडे जास्त संधी

Mumbai Thane Traffic Update : मुंबई -ठाणे वाहतूक कोंडी संपणार! दिड तासांचा प्रवास २५ मिनीटांत, मुंबई महापालिकेचा नवा प्लॅन असा

SCROLL FOR NEXT