मुंबई

दिघा रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

CD

दिघा रेल्वेस्थानकाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
वाहतूक ठप्प; वाहनचालकांसह स्‍थानिक नागरिक त्रस्त
वाशी, ता. १३ (बातमीदार) ः ठाणे–बेलापूर मार्गावरील दिघा रेल्वेस्थानकाबाहेरील परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्‍यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थाच विस्कळित झाली असून, सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
विटावा रेल्वे पुलापासून ते दिघा रेल्वेस्थानकापर्यंत जवळपास दीड ते दोन किलोमीटर लांब वाहतूक कोंडी दिसून येते. हातगाड्यांनी फुटपाथ आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर जागा व्यापल्याने वाहनांना मार्ग काढणे अवघड झाले आहे. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरावा लागतो. सततच्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वाहनचालक वेळेवर निश्चित स्‍थळी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे अनेक जण पटनी रस्ता वापरू लागले आहेत. या पर्यायी रस्त्यावरदेखील ग्रीन वर्ल्ड इमारतीजवळ हातगाड्यांची गर्दी असल्याने तिथेही वाहतूक ठप्प होते.
वाहनचालक व स्थानिक रहिवाशांनी या फेरीवाल्यांविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. काही रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या फेरीवाल्यांना काही स्थानिक राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. या निष्क्रियतेमुळे फेरीवाल्यांचा उत्साह अधिकच वाढला असून, त्यांनी संपूर्ण रस्ता व्यापला आहे.
................
‘नो हॉकिंग झोन’ घोषिण करण्याची मागणी
वाहतूक कोंडीमुळे केवळ खासगी वाहनेच नव्हे, तर रुग्णवाहिका, शालेय बस आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसतो. आपत्कालीन सेवा उशिरा पोहोचल्याने धोका निर्माण होत आहे. याशिवाय या ठिकाणी कचरा, अन्नपदार्थांचे अवशेष आणि अस्वच्छता वाढल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नवी मुंबई महापालिका, वाहतूक विभाग आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच पुलाखालचे आणि रस्त्यालगतचे क्षेत्र ‘नो हॉकिंग झोन’ म्हणून घोषित करून पोलिसांची कायमस्वरूपी गस्त ठेवावी, अशीही सूचना नागरिकांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘चहा-समोसा...!’ असा आवाज आता रेल्वे स्थानकांवर ऐकू येणार नाही; विक्रेत्यांचा आवाज थांबणार, प्रवाशांसाठी नवी योजना

Gadchiroli Solar School : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळा' उपक्रम!

Bee Attack : धान कापणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Ambegaon News: भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात; जालना जिल्ह्यातील १७ भाविक जखमी!

Shegaon News : शेगाव मध्ये कार मधून जाणारी दहा लाख रोकड पकडली; निवडणूक विभागाच्या पथकाची कार्यवाही

SCROLL FOR NEXT