अवयव प्रत्यारोपणात ग्लेनईगल्सची आघाडी
हजारांहून अधिक यकृत आणि पोटासंबंधी प्रत्यारोपण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : परळ येथील ग्लेनईगल्स रुग्णालयाने २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत १,००२ यकृत आणि पोटासंबंधी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला आहे. यात लहान मुलापासून थोरा-मोठ्यापर्यंत जिवंत आणि मृत दात्यांचे प्रत्यारोपण तसेच काही दुर्मिळ पोटाच्या प्रक्रियांचा समावेश आहे. प्रत्यारोपणानंतर पेरीऑपरेटिव्ह केअर आणि दीर्घकालीन फॉलोअपसह विशेष काळजी घेतली जाते.
यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ कुशल सर्जन, विशेष ॲनेस्थेशिया टीम, यकृत आणि प्रत्यारोपण आयसीयूमधील नर्सिंग कर्मचारी यांचा समावेश असलेली बहुविद्याशाखीय टीम २४ तास कार्यरत आहे. हिपॅटोलॉजीचे संचालक डॉ. अमित मांडोत यांनी हा टप्पा रुग्ण आणि कुटुंबांनी ठेवलेला विश्वास दर्शवतो, असे सांगितले. तर यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. अनुराग श्रीमल यांनी याला शस्त्रक्रिया कौशल्य आणि बहुविद्याशाखीय समन्वयाचे प्रतीक मानले.
ही कामगिरी मुंबईतील जागतिक दर्जाच्या क्लिनिकल केअरसाठीच्या वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही दाता व त्याच्या कुटुंबीयांचे मनापासून आभार मानतो, असे ग्लेनईगल्स रुग्णालय मुंबईचे सीईओ डॉ. बिपिन चेवले यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.